कोरोना प्रतिबंध लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् सरकारकडून मिळवा 5000 रूपयांचं बक्षीस, जाणून घ्या

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांसाठी लसीकरण सुरु केलं. तर आता लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी My Gov मार्फत एक योजना राबवली जात आहे. जी व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लस घेत आहेत. त्याला सरकारकडून आता पाच हजार रुपये मिळणार आहे. यासाठी त्या व्यक्तीने फक्त लस घेत असताना एक फोटो क्लिक करणे महत्वाचे असून तोच क्लिक केलेला फोटो पोस्ट करायचा आहे.

ADV

My Gov या मोहीमेअंतर्गत हि योजना सुरु केली आहे. जे लोक अथवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती लस घेताना फोटो शेयर करीत असेल वा त्यासोबत एक चांगली टॅगलाइन देत असेल तर अशा व्यक्तीला सरकारकडून ५ हजार रुपये जिंकण्याची संधी मिळत आहे. या दरम्यान, जर व्यक्ती अथवा त्याच्या कुटुंबातील कोणाही एकाने लस घेत असलेला फोटो एका चांगल्या टॅगलाइन बरोबर पोस्ट केला. तसेच या टॅगलाइनमध्ये लसीचे महत्त्व कसे आहे, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. यामधून जगाला प्रोत्साहन मिळायला हवे. दर महिन्यात यामध्ये १० चांगल्या टॅगलाइनचा वापर करणाऱ्यास ५-५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

या दरम्यान, My Gov या योजनेचा शेवट तारीख ३१ डिसेंबर आहे. या मोहिमेत आणखी कोणाला सहभागी व्हायचे असेल तर लस घेताना फोटो असणे आवश्यक आहे. तसेच, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. ज्यामध्ये मास्कचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी या http://cowin.gov.in वेबसाइटवर नोंदणी करणे महत्वाचे आहे. तसेच, ऑन साइट नोंदणी देखील करू शकणार आहे. तसेच, व्यक्ती COWIN पोर्टल अथवा आरोग्य सेतु अॅपवर देखील नोंदणी अथवा अपॉइंटमेंट बुक करू शकणार आहे.