पोस्टाच्या ‘या’ योजनेत १०० रुपयात उघडा खाते, FD पेक्षाही जास्त मिळणार व्याज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅंकेऐवजी तुम्हाला दुसरीकडे गुंतवणूक करून जास्त नफा मिळवायचा असल्यास तुमच्यासाठी पोस्टाने नवीन योजना आणली आहे. यासाठी तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवावे लागतील. या योजनेत बँकेतील एफडीपेक्षा देखील जास्त व्याज मिळते. या योजनेत पोस्ट ऑफिस तुम्हाला ७.९ टक्के व्याजदर देत असून या योजनेत पैसे गुंतवणे फार फायद्याचे ठरणार आहे.

काय आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना ?

या योजनेत तुम्ही सुरुवातीला १०० रुपयात खाते उघडू शकता. ज्यापद्धतीने १००,५००, आणि २००० रुपयांच्या नोटा असतात त्याचप्रमाणे हि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला मिळतात. यानुसार तुम्हाला कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची आहे हे तुम्ही ठरवू शकता.

या ठिकाणी उघडू शकता खाते

हि योजना पोस्टाची असल्याने तुम्हाला पोस्टातच जाऊन खाते उघडावे लागणार आहे. देशभरात कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खाते खोलू शकता.

या व्यक्ती करू शकतात गुंतवणूक

या योजनेत कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावे देखील पैसे गुंतवू शकता. या योजनेचा कालावधी हा ५ वर्षांचा असून यामध्ये तुम्ही हवी तितकी गुंतवणूक करू शकता.

या योजनेचा फायदा

या योजनेची मुदत हि ५ वर्षांची असून तुम्हाला या योजनेत ७.९ टक्के व्याजदर मिळणार आहे. हि योजना स्माॅल सेविंग्समध्ये येत असून दर तीन महिन्यांनी या योजनेच्या व्याजदरात बदल करण्यात येत असतात. या योजनेत तुम्ही १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास ९ वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील.

योजनेची मुदत

या योजनेचा कालावधी हा ५ वर्षांचा असला तरी तुम्ही १ वर्षानंतर देखील पैसे काढू शकता.

आयकरात सूट

या योजनेत पैसे पैसे गुंतवल्यास तुम्हाला आयकरात देखील सूट मिळणार आहे. आयकराच्या ८०-क नियमानुसार तुम्हाला आयकरात सूट मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त