Post Office Scheme | पोस्ट ऑफिस देत आहे जबरदस्त संधी, केवळ 417 रुपये जमा करून बनू शकता करोडपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | तुम्ही पैसे कुठेतरी बुडतील या भितीने तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर तुमच्यासाठी पोस्टाची योजना चांगला पर्याय आहे. पोस्टाच्या काही योजना अशा आहेत ज्या तुम्हाला काही वर्षांत करोडपती बनवू शकतात. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Post Office Public Provident Fund – PPF) अशा गुंतवणुकदारांसाठी आहे जे रोज किंवा मासिक पैसे वाचवून गुंतवणूक करू शकतात. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेवूयात. (Post Office Scheme)

 

पोस्ट ऑफिस PPF वर मिळते इतके व्याज
पोस्ट ऑफिस बचत योजना पीपीएफवर 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा असतो. यानंतर तो आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो. जर तुम्हाला 15 वर्षानंतर पैशांची गरत नसेल तर तुम्ही हा फंड पुढे वाढवू शकता.

 

इतकी करू शकता गुंतवणूक
या योजनेत दरवर्षी तुम्ही कमाल 1.50 लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता. तुम्ही वर्षात 1.50 लाख रूपये जमा करण्याऐवजी 12500 रूपये मासिक सुद्धा जमा करू शकता. म्हणजे रोज सुमारे 417 रूपये जमा करावे लागतील. याशिवाय प्राप्तीकर कायद्याचे कलम 80सी अंतर्गत पीपीएफवर कर सवलत सुद्धा मिळवू शकता. या योजनेत 22.5 लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर 15 वर्षांच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 18 लाख रूपयांचे व्याज मिळते. (Post Office Scheme)

इतके मिळू शकते व्याज
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला या योजनेत 12,500 रूपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षात 1.50 लाख रूपये होतील.
तर 15 वर्षात एकुण गुंतवणूक 22.50 लाख रूपये होईल, ज्यावर तुम्हाला वार्षिक व्याज 7.1 टक्के दराने मिळेल.
मॅच्युरिटीच्या वेळी एकुण फंड 40.70 लाख रूपयांचा होईल. ज्यामध्ये 18.20 लाख रुपयांचे व्याज मिळेल.

 

एकुण 25 वर्षांनी मिळेल इतका पैसा
जर तुम्ही हाच फंड पाच-पाच वर्षांसाठी पुढे वाढवला, म्हणजे एकुण गुंतवणूक 25 वर्षांसाठी केली
तर तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे 1.03 कोटी रूपये मिळतील.

 

Web Title :- Post Office Scheme | post office public provident fund ppf scheme will make you crorepati know policy details and investment benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

 

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

 

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत