Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ चांगल्या योजनांमध्ये गुंतवा पैसा, जाणून घ्या किती वेळात होतील दुप्पट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Schemes | जर तुम्ही बचतीसाठी नवीन योजना आखत असात तर पोस्ट ऑफिस (Post Office Schemes) च्या 3 विशेष सेव्हिंग स्कीम (Saving Schemes) लाभदायक ठरू शकतात. या योजनांद्वारे दरमहिना चांगली कमाई सुद्धा होऊ शकते. या योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स (NSC), पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (POTD) आणि किसान विकास पत्र (KVP) चा समावेश आहे. या योजनांबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

 

1. पोस्ट राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (Post Office National Saving Certificate)

राष्ट्रीय बचत पत्र किंवा NSC मध्ये दरवर्षी 6.8 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याज वर्षाला मॅच्युअर मिळते परंतु मॅच्युरिटीवर देय असते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा पैसे प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे. (Post Office Schemes)

 

2. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit)

या योजनेत एका ठराविक कालावधीसाठी एकरकमी पैसे जमा करू शकता. गॅरंटी रिटर्न आणि व्याज पेमेंटची पसंतीची सुविधा मिळते. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या मॅच्युरिटी कालवधीच्या जमा रक्कमेवर 5.5 टक्केच्या दराने व्याज मिळते. पाच वर्षाच्या खात्यावर 6.7 टक्के रिटर्न मिळते.

 

3. किसान विकास पत्र (KVP) :

किसान विकास पत्र (kisan vikas patra) पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकता. याची सुरुवात 1000 रुपयांपासून होते. हे बाँडप्रमाणे प्रमाणपत्राच्या रूपात जारी केले जाते. यावर सरकारकडून ठरलेले व्याज मिळते. सरकार दर महिन्यासाठी व्याज दर ठरवते. 6.9 टक्केच्या व्याजदाराने या स्कीम अंतर्गत 9 वर्ष आणि 2 महिने म्हणजे 110 महिन्यात पैसे डबल होतात.

Web Title :- Post Office Schemes | post office 3 best saving schemes tax free and give guarantee return

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा