Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | महाराष्ट्रातील काही ठिकाणी मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झालीय. परिणामी किनारपट्टी आणि येथील काही भागात (Maharashtra Rains) ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र या भागांत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या आहेत. तर आगामी 4 दिवस महाराष्ट्रात मेघांच्या गडगडाटसह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने IMD (Indian Meteorological Department) वर्तवला आहे.

 

हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात पाऊस (Rain) सुरु आहे. अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र आगामी 48 तासांत किनारपट्टीपासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. म्हणून राज्यातील अनेक भागात गडगडटासह पावसाची शक्यता (Maharashtra Rains) वर्तवली आहे.

 

दरम्यान, पुढील पाच दिवसामध्ये आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. तर, सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पुण्यासह राज्यातील (Pune Rains) अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. सध्या अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी (Maharashtra Rains) पोषक हवामान तयार होत असल्याचं हवामान खात्याकडून सांगितलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | upcoming 4 days heavy rain in maharashtra says imd rain in pune also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर

Kartik Purnima | केव्हा आहे कार्तिक पोर्णिमा? जाणून घ्या स्नान करण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

Life Certificate | केवळ 13 शिल्लक ! पेन्शनर्सने लवकर जमा करावा आपला हयातीचा दाखला, अन्यथा होईल नुकसान