Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये ऑनलाइन जमा करू शकता पैसे, मिळतो सर्वाधिक रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Schemes | विना जोखमीच्या पोस्ट ऑफिसच्या (without risk investment) छोट्या बचत योजनांमध्ये (small saving scheme) लोक गुंतवणूक करतात. या बचत योजना बँकांपेक्षा जास्त व्याजदर देतात. या प्रत्येक योजनेत स्थितीनुसार गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे मॅच्युरिटीवर (Return on Maturity) चांगला परतावा देखील मिळतो. (Post Office Schemes)

 

यामध्ये टॅक्स बेनिफिट्ससोबतच इतरही अनेक फायदे मिळतात, परंतु यापैकी अनेक योजना अशा आहेत, ज्या तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊन किंवा कोणाच्या तरी माध्यमातून जमा करू शकता. मात्र, आता छोट्या बचत योजनांमध्ये तुम्ही घरबसल्या डिजिटल पेमेंट (Digital Payment) करू शकणार आहात.

 

डिजिटल पेमेंट करण्यासाठी, तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) बचत खाते असणे आवश्यक आहे. IPPB एक डिजिटल बचत खाते देते जे तुम्ही घरातून वापरून शकता. आवर्ती ठेव (RD), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी खात्यात (SSY) आयपीपीबी मोबाइल अ‍ॅपद्वारे निधी जमा करू शकाल. या योजनांना प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत सूट आहे. (Post Office Schemes)

 

कसे उघडायचे खाते
खाते उघडण्यासाठी, पोस्ट ऑफिसला एकदाच भेट द्यावी लागेल, त्यानंतर तुम्ही सर्व काही ऑनलाइन मॅनेज करू शकता. 31 डिसेंबर 2021 रोजी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रक घोषणेमध्ये असे म्हटले आहे की सरकारने आर्थिक वर्ष 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस योजनांवरील व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

असे जमा करा ऑनलाइन पैसे
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून आयपीपीबी खात्यात पैसे जमा करावे लागतील.

आता तुम्ही DOP प्रॉडक्टवर जा.

यानंतर पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धीचा पर्याय निवडा.

जर PPF खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तो पर्याय निवडा.

आता पीपीएफ खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी टाका.

सुकन्या समृद्धी खात्यातही योगदान या अ‍ॅपद्वारे करता येईल.

यासाठी SSA खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी द्या.

यानंतर तुम्ही हप्त्याची रक्कम निवडून पैसे जमा करू शकता.

 

PPF, SSY वर व्याजदर
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) चौथ्या तिमाहीत 7.1% वार्षिक व्याजदर मिळेल. तर मुलींची सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यात 7.6% व्याजदर दिला जाईल.

 

Web Title :- Post Office Schemes | you can deposit money online in these schemes of post office get maximum returns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | चिंताजनक ! राज्यात आज ओमायक्रॉनचे 133 नवीन रुग्ण रुग्ण, सर्वाधिक पुण्यात 118 रुग्ण

 

Restrictions in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सकाळी जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद (मिनी लॉकडाउन)

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा वाढला ! गेल्या 24 तासात 41 हजारांहून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी