खुशखबर ! पोस्टाची लवकरच सुरु होणार स्वतंत्र ‘विमा’ कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – भारतीय पोस्ट विभाग लवकरच आयुर्विमा व्यवसायात प्रवेश करत आहे. पोस्ट विभाग विविध प्रकारच्या नवीन सेवा सुरु करून कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील असून विमा कंपनी हे त्याचेच एक रूप आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. पोस्ट विभागाची बँकिंग व्यवसायासह आता स्वतंत्र विमा कंपनीही लवकरच कार्यान्वित होणार आहे. येत्या दोन वर्षात ही कंपनी सुरु होईल. केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली.
सिन्हा म्हणाले की, ‘टपाल आयुर्विमा आणि ग्रामीण टपाल आयुर्विमा अशा दोन प्रकारातील विमा योजनांचे व्यवस्थापन आता स्वतंत्र व्यवसाय उपक्रमातून पाहिले जाईल. याबाबतचा प्रस्ताव खात्याने केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविला असून येत्या पंधरवडय़ात त्याला मंजुरी मिळेल.’ इंडिया पोस्ट बँकेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या सिन्हा यांनी, या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात व्यवसाय केंद्र तसेच दुसऱ्या टप्प्यात विमा कंपनी अस्तित्वात येईल, अशी माहितीही दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबरला पोस्ट पेमेंट बँक सेवेचा शुभारंभ केला असून देशभरात ही  बँक कार्यान्वित झाली आहे. सध्या पोस्ट जीवन विमा सेवा देत असून  ही  सर्वात जुनी विमा पॉलिसी मानली जाते. तिची सुरवात १८८४ मध्ये झाली होती.

चुकीच इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यु ; पुण्यातील ‘त्या’ प्रसिद्ध डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल