क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या शिरपेच्यात मानाचा तुरा बसलेला आहे. क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यात येणार आहे. या टपाल तिकीटाचे अनावरण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि.८) रोजी चापेकर वाड्यात होणार आहे.

चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरु होणे ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. तसेच यामुळे शहरवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
[amazon_link asins=’B00UFF422M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2de2e983-7f8a-11e8-9c9b-437b16d021af’]

यावेळी चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, स्मारक समितीचे समन्वयक रवी नामदे आदी मान्यवर उपस्थित होते.

चिंचवडगावातील, क्रांतीतीर्थ चापेकरवाडा राम मंदिराजवळ रविवारी (दि.८) दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित राहणार आहेत.

खासदार बारणे म्हणाले, “क्रांतीवीर चापेकर बंधुचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे. क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांनी १८९७ मध्ये वाल्टर चार्ल्स रॅण्डचा वध केला होता. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढण्याबाबत मी गेली तीन वर्ष पाठपुरावा करत होतो. चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. या माझ्या पाठपुराव्याला यश आले”
[amazon_link asins=’B076BHMFHV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’343a4b03-7f8a-11e8-a4c5-299b30218105′]

“केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरु होणे, ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. तिकीट काढण्यासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची पुर्तता चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी केली.