अतिसंवेदनशिल भागातुन पोलीसांचे शिस्तबध्द पध्दतीने पथसंचलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुक व होळी, रंगपचंमी सणाच्या पार्श्वभुमीवर शहरातील अतिसंवेदनशिल भागात दिल्लीहुन आलेल्या विशेष पथकाने पथसंचलन केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,  शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी आझाद नगर पोलीस स्टेशन मच्छीबाजार चौक येथुन ह्या पथसंचलनाची सुरवात करण्यात आली.  यानंतर मौलवीगंज चौक, घड्याळवाली मशीद, रामभाऊ दाढीवाला खुंट, चर्नी रोड, तिंरंगा चौक, ऐंशीफुटी रोड, भंगार बाजार, श्री छञपती पुतळा, पाचकंदिल जे.बी.रोड, शहर चौकी मार्गाने परत आझाद नगर पोलीस स्टेशन जवळ संचलन सांगता करण्यात आली. ज्या-ज्या मार्गाने हे संचलन झाले,  तेथील लोकांनी पोलीसांच्या ह्या ताफांचे कौतुकच केले. शिस्त बध्द पध्दतीने हा मार्च करण्यात आला. नागरीकांनी भिती मुक्त आपले कार्य करावे हाच एक संदेश पोलीस यंञणेने शहर वासियांना दिला.

जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशाने हा मार्च काढण्यात आला. याचे नेतृत्व उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिऩेश अहिरे, सी आय एफ चे अधिकारी एस डि चव्हाण, उपनिरीक्षक दिलीप माळी चार अधिकारी व विशेष पथकातील गनधारी 70 पोलीस कर्मचारी, सोबत आझाद नगर ठाण्याचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड असा एकुण 250 कर्मचारी यांचा सहभाग होता.