रोज फक्त १५० रुपयांच्या बचतीने मिळवू शकता २६ लाखांचा फंड ; पोस्ट ऑफिसमध्ये छोट्या बचतीची योजना !
पोलीसनामा ऑनलाईन टीम – लोकांना सर्वसाधारणपणे लहान बचतीचा फायदा समजत नाही. ते केवळ मोठ्या गुंतवणूकीचाच विचार असतात. परंतु जर आपण दररोजच्या खर्चापासून काही अनावश्यक खर्च थांबविला तर १००-१५० रुपये सहज वाचू शकता. जर तुम्ही ही रक्कम सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवली तर त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. येथे आपण पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेबद्दल बोलत आहोत. जिथे आपण दररोज १५० रुपये गुंतवत असाल तर २० वर्षांच्या कालावधीत तुम्हाला २६.६८ लाख रुपयांचा लाभ मिळेल.
२५ लाखांचा निधी २० वर्षात तयार होईल :
वयाच्या २५ व्या वर्षी, जर तुमचे उत्पन्न ३०-३५ हजार रुपयांपर्यंत असेल, तर इतर कोणत्याही बचतीच्या व्यतिरिक्त, सुरुवातीला दररोज १००-१५० रुपयांची बचत केली जाऊ शकते. ही बचत तुम्हाला वयाच्या ४५ व्या वर्षी २५ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देऊ शकते, जेणेकरून तुम्हाला नोकरी करतांना आपल्या मोठ्या गरजा सहजपणे पूर्ण करू शकता.
या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करा :
पोस्ट ऑफिस पीपीएफ खाते उघडण्याची सुविधा प्रदान करते. ही खाती १५ वर्षांसाठी उघडली जाऊ शकतात, जी पुढे ५ वर्षांसाठी वाढविली जाऊ शकतात. पीपीएफ वर अजूनही ८% व्याज दर आहे जो दरवर्षी चक्रवाढ व्याजदरानुसार वाढविला जातो. पीपीएफमध्ये किमान १०० रुपये भरून खाते उघडता येते. एका वर्षात किमान ५०० रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, तर एका वर्षात तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता.
२० वर्षांत असे मिळणार २६.६८ लाख रुपये :
जर तुम्ही दररोज १५० रुपयांची बचत करुन पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर ते दरमहा ४५०० इतकी होईल. प्रत्येक महिन्यात ४५०० रुपये गुंतवल्यास वार्षिक गुंतवणूक ५४ हजार रुपये होईल. त्याचबरोबर २० वर्षातील एकूण गुंतवणूक १०.८० लाख रुपये असेल. वर्षाकाठी ८% चक्रवाढ व्याजानुसार आपल्याला २० वर्षात २६.६८ लाख रुपयांचा निधी तयार होईल. म्हणजेच एकूण गुंतवणूकीवर तुम्हाला १५.८८ लाख रुपयांचे अतिरिक्त व्याज मिळेल.
पीपीएफ खात्याचे फायदे :
-हे खाते फक्त १०० रुपयांपासून उघडता येते.
-संयुक्त खातेदेखील उघडता येते.
-खाते उघडण्याच्या वेळी नामांकन सुविधा आहे.
-१५ वर्षांचा मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही ते ५-५ वर्षासाठी दोन वेळा वाढवता येऊ शकते.
-ही मिळकत करमुक्त आहे.
– तिसर्या आर्थिक वर्षापासून खात्यावर कर्जही घेतले जाऊ शकते.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा