PPF Small Saving Scheme | इथं केली गुंतवणुक तर सेवानिवृत्तीच्या वेळी बनू शकता करोडपती; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PPF Small Saving Scheme | जर तुम्ही सेवानिवृत्तीचा काळ चांगला जावा यासाठी जोखीम नसलेली आणि कर सवलत मिळणारी योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी अशीच एक सरकारी योजना आहे. ही योजना सरकारद्वारे (government Small Investment Scheme) चालवली जाणारी पीपीएफ (Public Provident Fund) योजना आहे. ही छोटी बचत योजना (PPF Small Saving Scheme) तुमच्यासाठी योग्य आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (long term investment) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सेवानिवृत्तीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. यातून मिळणारे व्याजाचे उत्पन्न करमुक्त असते. त्यावरील व्याज प्राप्तीकर 80 सी अंतर्गत करमुक्त आहे.
सेवानिवृत्तीसाठी करमुक्त निधी तयार करण्याचा पीपीएफ सर्वात योग्य मार्ग आहे. एनपीएस किंवा म्युच्युअल फंडासारख्या जास्त रिटर्न देणार्या गुंतवणुकीवर टॅक्स भरावा लागतो; पण पीपीएफमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम करमुक्त आहे.
एका आर्थिक वर्षात यामध्ये कमीतकमी 500 रुपये किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. नियमितपणे पीपीएफ अकाउंटमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर 1 कोटी रुपये मिळू शकतात.
–
असे मिळतील 1 कोटी
यासाठी गुंतवणूकदाराला 25 वर्षं दरवर्षी दीड लाख रुपये जमा करावे लागतील.
यावर सध्याच्या व्याजदरानुसार 1 कोटी रुपये मिळतील.
यावर चक्रवाढ व्याज दीर्घ कालावधीसाठी मिळते. जर 20 वर्षं दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले, तर सध्याच्या व्याजदरानुसार 66.60 लाख रुपये मिळतील.
गुंतवणुकीची मुदत आणखी 5 वर्षांसाठी वाढवली तर पीपीएफ शिल्लक 1 कोटी रुपये होईल. (PPF Small Saving Scheme)
25 ते 30 व्या वर्षी खाते उघडल्यास…
25 ते 30 वर्षं वयोगटात पीपीएफ अकाउंट उघडल्यास आणि 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये ते तीनदा वाढवल्यास, निवृत्तीपूर्वी 30 वर्षं गुंतवणूक करू शकता.
30 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवर 1.54 कोटी रुपये मिळतील.
टॅक्समध्ये मिळते सवलत
पीपीएफ गुंतवणुकीला ट्रिपल ई टॅक्स सवलतीचा (Tax Benefit) लाभ मिळाला आहे.
येथे ट्रिपल ई म्हणजे गुंतवलेल्या पैशावर कोणताही टॅक्स नाही.
मिळणारे व्याजही करमुक्त आहे. 15 वर्षांनी मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम सुद्धा करमुक्त आहे.
तसेच या खात्यात केलेली 1.5 लाख रुपयांची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.
या योजनेत मिळणारे व्याज इतर योजनांपेक्षा जास्त म्हणजे 7.1 टक्के आहे. तसेच गॅरंटी रिटर्न मिळतो.
Web Title :- PPF Small Saving Scheme | ppf small saving scheme public provident fund investment check interest rate and ppf calculator
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Dark Circle Instant Removal Trick | आता 1 मिनटात डार्क सर्कल्स करा गायब, जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय