प्रभूदेवाने केलं फिजिओथेरपिस्टशी ‘गुपचुप’ लग्न, भावाने सांगितलं यामागील ‘सत्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रभूदेवाने लॉकडाऊनमध्ये लग्न केल्याची चर्चा फारच रंगली आहे. प्रभुदेवा त्याच्या आपल्याच भाचीशी लग्न करणार असल्याची चर्चा अलीकडे होती. मात्र, या अफवेलात्याने पूर्णविराम दिला. त्याने एका फिजिओथेरपिस्ट सोबत लग्न केलं.प्रभुदेवा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेउन चर्चेत आहे. प्रभुदेवाच्या भावाने अखेर त्याने केलेल्या गुपचुप लग्नाचा खुलासा केला आहे.

मध्यंतरी प्रभुदेवाच्या पाठीला दुखापत झाली होती. तेव्हा तो डॉक्टर हिमानी या फिजिओथेरपिस्टकडे उपचार घेत होता. प्रभुदेवावर डॉक्टर हिमानी हिने उपचार केले होते. तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लॉकडाऊन दरम्यान मार्चमध्ये चेन्नईला ते गेले. तिथे दोन महिने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले.यानंतर दोघांनी मे महिन्यात लग्न केले. लॉकडाऊनमुळे लग्नात कोणीही आले नाही. मात्र, डॉक्टर हिमानी आतापर्यंत दोनदा मैसूर मध्ये सासरच्यांना जाऊन भेटली आहे

प्रभुदेवाचा भाऊ राजू सुंदरम म्हणाला, की प्रभुदेवाच्या लग्नामुळे खूप खुश आहे. अभिनेत्री नयनतारासाठी त्याने पत्नीला सोडले होते. प्रभुदेवा व नयनतारा ची ऑफर चांगलेच गाजले होते. प्रभुदेवाचे हे दुसरे लग्न आहे. प्रभूदेवाने १९९५ साली रामलता सोबत पहिले लग्न केले होते. रामलता पासून त्याला तीन मुले झाली. २००८ मध्ये प्रभूचा मोठ्या मुलाचे कॅन्सरने निधन झाले होते. २०११ मध्ये प्रभूदेवाने पत्नी रामलतापासून घटस्फोट घेतला होता.

You might also like