Pradhan Mantri Awas Yojana | पीएम आवास योजना संबंधीत पात्रतेच्या महत्वाच्या अटी, जाणून घ्या कोणते कागदपत्र लागणार, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : Pradhan Mantri Awas Yojana | देशातील गरीब आणि मागासलेल्या घटकांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार (Central Government) पंतप्रधान आवास योजना चालवत आहे. या योजनेचा लाभ घेऊन देशातील कोट्यवधी नागरिकांनी स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न साकार केले आहे (Pradhan Mantri Awas Yojana).

या अंतर्गत लोकांना पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. तुमचे पक्के घर अद्याप नसेल, तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळतो. मात्र, यासाठी अर्ज करताना खूप काळजी घ्यावी लागेल. कारण छोटीशी चूक झाली तरी योजनेच्या लाभांपासून वंचित राहावे लागते. (Pradhan Mantri Awas Yojana)

कोणाला मिळतो योजनेचा लाभ?
पीएम आवास योजनेच्या नियमांनुसार अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःचे घर नसावे. कुटुंबातील एखाद्याला सरकारी नोकरी असली तरी योजनेचा लाभ घेता येत नाही. ईडब्ल्यूएस आणि एलआयजी कॅटेगरीत महिला कुटुंब प्रमुखालाच योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, ईडब्ल्यू कॅटेगरीतील व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

पंतप्रधान आवास योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला घर बांधण्यासाठी २.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. योजनेत कुटुंबाच्या उत्पन्नानुसार कर्ज व सबसिडी दिली जाते.

यामुळे रिजेक्ट होऊ शकतो अर्ज
पीएम आवास योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, प्रत्येकाने पात्रता तपासली पाहिजे.
कारण योजनेत अपात्र ठरल्यास अर्ज रिजेक्ट होतो. प्रथम लाभाथ्र्यांची यादी जारी करून त्यानंतर अर्जदाराची चौकशी
केली जाते. यानंतर सर्व काही बरोबर असल्याचे आढळल्यानंतर घर बांधण्यासाठी फक्त आर्थिक मदत मिळते.

ही कागदपत्रे आवश्यक
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला,
रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chia Seeds | आरोग्यासाठी अतिशय चमत्कारी हे छोटे-छोटे बी, अनेक मोठ्या आजारापासून करते सुटका, हैराण करतील हे ५ फायदे

Pune Crime News | रस्त्याने जाणार्‍या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पकडले

22 August Rashifal : मेष आणि तुळ राशीवाल्यांना आज येईल संमिश्र अनुभव, वाचा दैनिक भविष्य