खुशखबर ! मोदी सरकार देणार दुकानदारांना दरमहा 3000 रूपयांची पेन्शन, जाणून घ्या नाव नोंदणी पक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने दुकानदार, किरकोळ विक्रेते आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेला ‘प्रधानमंत्री लघु उद्योग मानधन योजना’ असे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकार आजपासून ही योजना सुरू करणार आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडची राजधानी रांची येथे ही योजना लॉन्च करणार आहेत. या योजनेत दुकानदार, किरकोळ विक्रेते आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना किमान 3,000 रुपये मासिक पेन्शन देण्यात येईल. या योजनेचा फायदा सुमारे 3 कोटी किरकोळ व्यापारी आणि दुकानदार व स्वयंरोजगारांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला ही योजना जाहीर केली होती. पुढील 3 वर्षात या योजनेत 5 कोटी दुकानदार जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

नक्की कोणाला भेटणार फायदा
दीड करोडपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेले सर्व दुकानदार, कामगार आणि किरकोळ व्यापारी या योजनेचा फायदा घेऊ शकतात. तसेच लाभार्थ्यांसाठी या योजनेत वयाची अट आहे ज्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे तोच या योजनेचा उपभोग घेऊ शकतो.

कशी करायची नाव नोंदणी
या योजनेचा फायदा घेण्यासाठी कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करता येते. पेन्शन योजनेत सरकार सुद्धा बरोबरीचे योगदान देणार आहे. या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी फक्त बँक अकाऊंट आणि आधार कार्डची गरज लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –