Prakash Ambedkar | काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिला आहे, पण त्यांचे अजून उत्तर आले नाही – प्रकाश आंबेडकर

अमरावती | पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेकडे (Shivsena) युतीसाठी पर्याय दिला होता. पण अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. आम्ही आमची चादर बघून पाय पसरतो. त्यामुळे लोकसभेत आमची मते किती आहेत हे आम्ही जाणतो आणि त्यानुसार आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तो जर आम्हाल मिळत नसेल, तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी खाजगीकरणावर (Privatization) देखील भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, देशात जे
खाजगीकरण सुरु आहे, त्याचा मालक जर का कोणी भारतीय व्यापारी होणार असेल, तर त्याला आमचा विरोध नाही.
तो पैसा भारतात राहणार आहे.
पण ज्याप्रकारे देशातील कंपन्यांचे खाजगीकरण केले जात आहे आणि तो सर्व पैसा विदेशात जात आहे,
त्याला आम्ही विरोध करत आहोत.
देशातील पैसा देशात खेळता राहिला पाहिजे. देशातील प्रत्येक घटकाकडे पैसा असला पाहिजे,
पण जर का तो काही कुटुंबाकडे राहणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे, असे देखील आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

Web Title :- Prakash Ambedkar | Congress and Shiv Sena have been given the option of an alliance, but their answer is yet to come – Prakash Ambedkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा