Sanjay Raut | प्रिय आई, जय महाराष्ट्र; संजय राऊतांचे आर्थर रोड तुरुंगातून आईला पत्र, म्हणाले-‘…म्हणून मला तुझ्यापासून दूर जावे लागत आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patrachal Land Scam) शिवसेनेचे प्रवक्ते (Shivsena Spokesperson) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ED) त्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपाखाली अटक (Arrest) केली आहे. बाहेर शिवसेनेचा आपल्याच पक्षातील बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) गटासोबत संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या आईला आर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) एक पत्र लिहिले आहे.

आई मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक असेच उभे असतात. ते महिनोनमहिने घरी येत नाहीत. लढाई अशीच असते. मला देखील अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुष्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाच्याविरोधात मी लढा देत आहे. त्यामुळे मला तुझ्यापासून दूर जावे लागत आहे. हा कणखरपणा कठोरपणा मी तुझ्याकडून घेतला नाही का? असे संजय राऊतांनी (Sanjay Raut) पत्रात म्हंटले आहे.

यावेळी पत्रात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील भाष्य केले आहे. भुजबळ (Chagan Bhujbal) आणि राणे (Narayan Rane) ज्यावेळी शिवसेना सोडून गेले तेव्हा देखील तुझा त्रागा मी पाहिला आहे. आता पुन्हा शिंदे नावाचा गट शिवसेनेवर हल्ले करु लागला आहे. तेव्हा काहीतरी करा, शिवसेना वाचवा, असे तूच सांगत होतीस ना, असे संजय राऊत पत्रात म्हणाले.

खूप वर्ष पत्र लिहिण्याचा योग आला नाही. रोज सामनासाठी अग्रलेख लिहीत होतो.
स्तंभ लिहीत होतो. पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोज भेटतच होतो.
दौऱ्यावर असताना, सकाळ संध्याकाळ रोज फोनवर बोलत होतो.
त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहिण्याचे राहून गेले.
आता ही संधी केंद्र सरकारने (Central Government) दिली आहे, असे देखील राऊतांनी पत्रात म्हंटले आहे.

Web Title :- Sanjay Raut | shivsena sanjay raut letter to mother patra chawl scam ed judicial custody arthur road jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा