Prakash Ambedkar-Manoj Jarange Patil | लोकसभेला काहीतरी वेगळं घडतंय, ‘शिवशक्ती-भिमशक्ती’ एकत्र येण्याची चिन्हं, रात्री उशीरा जरांगे-आंबेडकरांची भेट

जालना : Prakash Ambedkar-Manoj Jarange Patil | काल रात्री पावणे बाराच्या सुमारास अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे यांची वंचित बहुजन आघाडीचे (Bahujan Vanchit Aghadi) प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीसोबतची (Mahavikas Aghadi) वंचितची चर्चा जवळपास फिस्कटली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेसाठी शिवशक्ती-भिमशक्तीचा (Shivshakti-Bhimshakti) नवा प्रयोग होऊ शकतो का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सुमारे दिडतास झालेल्या या चर्चेत लोकसभा निवडणुकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा की नाही, हे समाजाशी बोलून ३० तारखेला निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर माविआसोबत जागा वाटप अंतिम होत नसलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री अंतरावाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेवून जवळपास दीड तास चर्चा केली. लोकसभा निवडणुकीसह इतर बाबींवर ही चर्चा झाली.(Prakash Ambedkar-Manoj Jarange Patil)

या भेटीनंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीसह पुढील वाटचाल कशी करायची? यासह इतर विषयांवर चर्चा झाली. संयुक्त निवडणूक लढायची का? यावर मात्र वेळ येईल त्यावेळी सांगू. आम्ही भेटलो म्हणजे सकारात्मक चर्चा झाली, असे आंबेडकर म्हणाले.

तर मनोज जरांगे म्हणाले, माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही म्हटले तर नाही आणि समाज हो म्हटला तर इतक्या ताकदीने उतरणार की त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात हलके घ्यायचे नाही. वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिले आहेत.

जरांगे पुढे म्हणाले, गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. समाजाच्या म्हणण्यानुसार ३० तारखेला चित्रच स्पष्ट करू.
गावा-गावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेवू. माझा जन चळवळीवर विश्वास आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या २४ मार्चच्या राज्यव्यापी बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदार संघातून एक अपक्ष उमेदवार द्यावा.
त्यातही प्रत्येक जाती-धर्माचा उमेदवार द्यावा, असा निर्णय मराठा समाजाच्या संमतीने घेतला होता.
यासाठी गावा-गावात समाजाची बैठक घेवून समाजाचा होकार किंवा नकार टक्केवारीत कळवा अपक्ष उमेदवार देण्याबाबत ३० तारखेला निर्णय घेवून असे जरांगे म्हणाले होते.

या बैठकीनंतर दोन-तीन दिवसातच वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अंतरवाली सराटीत काल मध्यरात्री घेतलेली भेट लक्षवेधक ठरली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha Election 2024 | शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे ‘नाईलाजास्तव’ लादलेले उमेदवार ! अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागतो हे शरद पवार यांचे नेतृत्व सिद्ध करते – डॉ. अमोल कोल्हे

Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

Sanjay Raut On Mahayuti | महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल, गुलाम, मांडलिक, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, वंचितबाबत म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट? धंगेकर-मोहोळ यांच्या समोर वसंत मोरे ठरू शकतात मोठे आव्हान, कारण…

Pune Crime Branch | केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई (Video)