Prakash Ambedkar | ‘वंचित’साठी सकारात्मक वातावरण, यंदा लोकसभेचे खाते नक्की उघडणार : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Prakash Ambedkar | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी विश्वास व्यक्त केला की, वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण आहे. यंदा आम्ही लोकसभेचे खाते नक्की उघडू.(Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाचे कर्ज वाढले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती प्रभाकरन १० दिवसांपूर्वी म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपेल. निवडणुका होणार नाहीत. संविधान संपेल.

बारामतीत सुप्रिया सुळे यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आम्हाला भेटून विनंती केल्यामुळे आम्ही बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिला. त्या ठिकाणी आमचा उमेदवार दिला नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार