Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर, फुलंही उधळली; नव्या वादाची शक्यता (VIDEO)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. एवढच नाही तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलंही अर्पण केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगजेबावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) औरंगजेबाच्या कबरीला (Aurangzeb Tomb) का भेट दिली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या औरंगाबाद नामांतर, औरंगजेबाचे पोस्टर, स्टेटस ठेवल्यावरुन राज्यभर वादविवाद होत आहेत. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला होता. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, भारताच्या दृष्टीकोनातून खुलताबाद हे ऐतिहासिक शहर आहे, त्याचा लोकांनी विचार करावा. नावावरुन भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे. त्यांना एवढच सांगतो औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं, ते कुणाला मिटवता येणार नाही, असंही ते म्हणाले.

औरंगजेबाचे राज्य आलं ते जयचंदमुळे आलं हे बाबासाहेबांनी सांगितले आहे. असे जयचंद बऱ्याच हिंदू राजांमध्ये होते,
त्यांना तुम्ही शिव्या का घालत नाही? ही ताकद दाखवा ना. ज्यांनी या देशाला गुलाम केलं त्यांची निंदा करा,
असेल ताकद तर करुन दाखवा, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Web Title :  Prakash Ambedkar | prakash ambedkar visits aurangzebs tomb possibility of fresh controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या 3 गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 1 काडतुस जप्त

Congress Leader Mohan Joshi | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी – मोहन जोशी

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ