‘बिग बॉस 13’ चं काय होणार, केंद्र सरकारने घेतील ‘ही’ भूमिका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिग बॉस 13 अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच या शोमध्ये नेमकं काय चालतं याचा अहवाल आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडे मागितला आहे. येत्या आठवड्यात हा अहवाल प्राप्त होणार असून त्यानुसार पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.


बिग बॉस 13 प्रसराणावर बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे का यावर बोलताना जावडेकर यांनी तसा कोणताही आदेश देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. या शोमधील कंटेंटची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

अभिनेता सलमान खान होस्ट असलेल्या हा रिअ‍ॅलिटी शो पहिल्या भागापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नव्या सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बीएफएफ म्हणजेच बेड फ्रेण्ड फॉरएव्हर हा बदल अनेकांना पटलेला नाही. यानुसार पुरुष आणि स्त्री स्पर्धकाला एकच बेड शेअर करण्यास सांगितले आहे. यातून समाजात अश्लिलता पसरवली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रारी करण्यात आल्या असून याची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like