पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावरून प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या – ‘…तर काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेतील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना लागू असलेले पदोन्नतीमधील आरक्षण(Promotion reservation) ठाकरे सरकारने रद्द केले आहे. मात्र यावरून कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने या संदर्भात सर्व आमदार, अभ्यासक, समाजातील विविध क्षेत्रातील मंडळी आदीशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. जवळपास 500 जण यात सहभागी झाले होते. यात आमदार प्रणिती शिंदे यांच्या व्हिडिओची क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यात प्रणिती शिंदे यांनी यासाठी सरकारवर दबाव आणणे तसेच सुप्रीम कोर्टात याच्या विरोधात याचिका दाखल करून त्यावर स्टे आणणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसला विश्वासात न घेता सरकारने हा अध्यादेश लागू केला असून हे अत्यंत चुकीचे आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे प्रणिती शिंदेंनी कौतुक केले आहे. सरकार जर हा अध्यादेश मागे घेत नसेल तर काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

दिलासादायक ! देशात मंदावला कोरोनाचा वेग, मागील 24 तासात आली 45 दिवसातील सर्वात कमी प्रकरणे

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या संदर्भातला अध्यादेश 7 मे रोजी आला आहे. त्यानंतर याबाबत भूमिका घ्यायला दिरंगाई झाली आहे. मात्र तस असले तरी देर आये दुरुस्त आये म्हणजे याबाबत आता पुढे काय करायचे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सर्वात आधी महाविकास आघाडी सरकारवर दबाव निर्माण करून हा जीआर माग घ्यायला भाग पाडावे लागेल, असे त्या म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी अत्यंत संवेदनशील पत्र याबाबत राज्य सरकारला लिहिल होते. पण त्याकडेही दुर्लक्ष करून हा जीआर लागू करणे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. अनुसुचित जाती जमातींच्या विविध योजना किंवा इतर उपक्रमांसाठीचा खूप निधी पडून आहे. हा निधी खर्च करून गरीबासाठी काम करणे गरजेचे असल्याचा मुद्दाही शिंदे यांनी मांडला आहे.

 

नवीन पालकांसाठी उपयुक्त आहेत ‘या’ Tips,‌ नवजात मुलास हाताळणे होईल सोपे; जाणून घ्या

अजित पवारांनी केलं नवे CBI संचालक जयस्वाल यांचे स्वागत, म्हणाले…

उच्च रक्तदाबाच्या (High BP) रूग्णांनी केवळ ‘मीठ’चं नव्हे तर ‘या’ 5 गोष्टींच्या सेवनावर ठेवावं नियंत्रण, जाणून घ्या

MHA नं पाकिस्तानसह ‘या’ 2 देशांमधून आलेल्या 13 जिल्ह्यातील बिगर-मुस्लिम निर्वासितांकडून भारतीय नागरिकत्वासाठी मागवले अर्ज

Corona : चष्मा घातल्यास ‘कोरोना’ची लागण होण्याचा धोका 3 पट होतो कमी, स्टडीमधील दावा