Prasad Oak | ‘गोदावरी’ सिनेमा पाहून भारावून गेलेल्या प्रसाद ओकने चित्रपटाबद्दल लिहिली ‘ही’ खास पोस्ट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – उत्तम अभिनेता म्हणून चाहत्यांच्या मनात जागा करणारा अभिनेता (Actor) म्हणजे प्रसाद ओक (Prasad Oak). केवळ अभिनय क्षेत्रातच नाही तर दिग्दर्शक (Director) म्हणूनही प्रसाद ओकने उत्तम अशी कामगिरी केली आहे. सध्या बॉलीवूड (Bollywood) प्रमाणे मराठी सिनेमांवर देखील टीका केल्या जात आहेत. अशा वातावरणात प्रेक्षक सध्या ‘गोदावरी’ (Godavari Movie) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नामांकित सोहळ्यात स्क्रीनिंग झाल्यानंतर सिनेमा अखेर महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा प्रीमियर नुकताच पार पडला यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओकने (Prasad Oak) हजेरी लावली होती. चित्रपट पाहून झाल्यावर प्रसाद ने एक पोस्ट शेअर केली. सध्या प्रसाद ओकची हि पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्यासारखी वायरल होत आहे.

 

गोदावरी सिनेमा पाहिल्यावर प्रसादने ही प्रतिक्रिया शेअर केली आहे. प्रसाद ने आपल्या instagram अकाउंट वरून गोदावरी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत असे म्हटले आहे की, “लेखकाला जे कागदावर म्हणायचंय ते आणि दिग्दर्शकाला जे पडद्यावर म्हणायचंय ते जेव्हा संपूर्ण टीम ला 100 % कळलेलं असतं तेव्हा #गोदावरी सारखा चित्रपट निर्माण होतो..!! सध्याच्या गढूळ वातावरणात जर मराठी चित्रपटाचं “पावित्र्य” म्हणजे काय ते जाणून घ्यायचं असेल तर “गोदावरी” पहायलाच हवा. प्राजक्तचं नितांत नितळ लेखन. निखिल चं तितकंच तरल दिग्दर्शन. सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय. विक्रम काकांबद्दल (Vikram Gokhale) मी काय बोलू?? ते “बाप” आहेत आणि कायमच रहाणार.

 

मोने (Sanjay Mone) आणि नीनाताई (Neena Kulkarni) अप्रतिम. प्रियदर्शन (Priyadarshan Jadhav) आणि मोहित टाकळकर (Mohit Takalkar) लाजवाब. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो गौरीचा (Gauri Nalawade) आणि आमच्या जित्याचा (Jitendra Joshi). कॅमेऱ्यासमोरची सहजता म्हणजे काय, सट्ल अभिनय म्हणजे काय ते गौरीनी आणि भूमिका उमजून काम करणं म्हणजे काय, इंटेन्स अभिनय म्हणजे काय ते जित्यानी क्षणोक्षणी सिद्ध केलंय. ए व्ही प्रफुलचंद्रचं (AV Prafullachandra) नकळतपणे येणारं पार्श्वसंगीत हि या चित्रपटाची अत्यंत महत्वाची बाजू.
संकलनामुळे चित्रपटाला आलेला “ठेहेराव” खूप मोलाचा आहे. “समृद्ध” मराठी चित्रपट म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर “गोदावरी” नक्की पहा.
उद्यापासूनच सर्वत्र प्रदर्शित होतोय. संपूर्ण टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा…!!!”.

 

प्रसाद ओकच्या पोस्ट ने सध्या चाहत्यांच्या मनात ‘गोदावरी’ चित्रपटाविषयी अजूनच उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळाले.
प्रसादच्या या पोस्टमध्ये त्यांनी सिनेमातील सर्व कलाकारांचे कौतुक केले.
त्याचबरोबर हा सिनेमा पाहून तो भावुक झाल्याचेही प्रसाद ने म्हटले आहे.

 

Web Title :- Prasad Oak | dharmaveer starrer prasad oak shares post after watch godavari film jitendra joshi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण