पर्वा नाही तर मग ‘CAA-NRC’ ची ‘क्रोनॉलॉजी’ लागू करा, अमित शहांना ‘आव्हान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्यांमुळे विरोधकांत प्रचंड संताप दिसत आहेत. या दोन्ही कायद्यांना विरोध होताना दिसत आहे. राजकीय वातावरण ढवळून गेले असताना आता जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. कायद्याला होणाऱ्या विरोधाची पर्वा नसेल तर तुम्ही सीएए आणि एनआरसी लागू करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत असा सवाल प्रशांत किशोर यांनी अमित शाहांना विचारला आहे.

सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही, विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. याच वक्तव्यावरुन प्रशांत किशोर यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमित शाहांवर निशाणा साधला. प्रशांत किशोर म्हणाले की नागरिकांचे मतभेत फेटाळून लावणे, हे कोणत्याही सरकारच्या ताकदीचे संकेत असू शकत नाहीत. तुम्ही सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यांची पर्वा करत नाही. तर हा कायदा लागू करण्यासाठी पुढाकार का घेत नाही? तुम्ही देशासाठी मोठा निर्णय घेतला आहे, त्याच क्रोनॉलॉजीमध्ये सीएए आणि एनआरसीला लागू करण्याचा प्रयत्न करा.

https://twitter.com/PrashantKishor/status/1219824934484152326

अमित शाहांनी मंगळवारी लखनऊ येथे सीएएच्या समर्थनात घेतलेल्या सभेत कायदा मागे घेणार नसल्याचे विरोधकांना खडसावले. अमित शाह यांनी बहुजन समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्या टीका केली. सीएएवरुन होणाऱ्या हिंसाचाराला हेच पक्ष जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

सध्या सीएए, एनआरसीच्या विरोधात देशभर आंदोलनं होत आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –