Pravin Darekar | आसमानी संकटाने शेतकरी हवालदील, तरीही सरकारला प्रतीक्षा अहवालाची – प्रवीण दरेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pravin Darekar | आसमानी संकटामुळे महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला आहे. हजारो हेक्टरी शेतजमीनवरचे पिक मातीसह वाहून गेले आहे. तर कायम कोरड्या राहणाऱ्या नद्या आज दुथड्याभरून वाहत आहेत. त्यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ठोस मदत करण्याची गरज असताना सरकारकडून नुकसानीच्या अहवालाची प्रतीक्षा केली (Pravin Darekar) जात आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे (agriculture minister dada bhuse) यांनी ट्विट करत महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषि अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे सुरू करावेत.
एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही यापद्धतीने कार्यवाही करावी.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीचे धोरण ठरविले जाईल, असं सांगितले आहे.
त्यामुळे सरकारकडून अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचं स्पष्ट होत.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील सरकारकडून मदत जाहीर करण्यास विलंब होत असल्याने टीका केली आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही.
सरकारमधील मंत्री धनंजय मुंढे यांनी स्वतः पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केलीये. तर मुख्यमंत्री पंचनामे करा म्हणतात.
सरकारने अभ्यास करत न बसता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग होणार नाही, असं दरेकर यांनी म्हंटले आहे.

 

दरम्यान, पूर भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी दोन दिवसांनी मराठवाड्याचा दौरा करणार आहोत,
अशी माहिती दरेकर यांनी दिली आहे.

 

Web Title : Pravin Darekar | Farmers deported due to skyrocketing crisis, still waiting for report from government – Praveen Darekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Electric two-wheeler | अँटी-थेफ्ट फीचरची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये धावते 160 किलोमीटर, जाणून घ्या किंमत

Air Marshal V R Chaudhari | गौरवास्पद ! महाराष्ट्रातील नांदेडचे सुपुत्र व्ही. आर. चौधरी हवाई दलाच्या प्रमुखपदी

Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’