दुर्देवी ! ज्या हॉस्पीटलमध्ये डॉक्टरनं सलग 50 वर्ष केली रूग्णांची सेवा, तिथंच नाही मिळाले व्हेंटिलेटर; अखेर कोरोनामुळं झाला मृत्यू

ADV

प्रयागराज : डॉक्टर जे. के. मिश्रा प्रयागराज शहरातील प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांनी स्वरूप राणी हॉस्पिटलसाठी (एनआरएन) आपल्या जीवनातील जवळपास पन्नास वर्ष सेवा दिली होती. येथे त्यांनी डॉक्टरांना शिकवले, लोकांवर उपचार केले परंतु जेव्हा हेच डॉक्टर मिश्रा कोविडने पीडित झाले तर त्यांना याच हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरही मिळाला नाही.

कोरोनाने पीडित डॉक्टर जे. के. मिश्रा यांची स्थिती गंभीर झाली, मोठ्या प्रयत्नानंतर सुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मिळाला नाही आणि त्यांनी आपल्या कोरोना संक्रमित डॉक्टर पत्नीच्या समोर जीव सोडला.

ADV

स्वरूप राणी हॉस्पिटलला प्रयागराजमधील सर्वात मोठे हॉस्पिटल समजले जाते. या हॉस्पिटलमध्ये 85 वर्षांचे डॉक्टर जे. के. मिश्रा यांनी आपल्या जीवनातील पन्नास वर्षे काम केले. 16 एप्रिलला कोविडमुळे त्यांना याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्यांना येथे व्हेंटिलेटर मिळाले नाही. कोरोनाशी लढा देता-देता त्यांनी कोरोना पीडित आपली पत्नी डॉक्टर रमा मिश्र यांच्या समोरच अखेरचा श्वास घेतला.

डॉ. रमा मिश्र यांच्यानुसार 13 एप्रिलला त्यांची ऑक्सीजन लेव्हल कमी होऊ लागली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यास सांगितले, परंतु त्यांना वेळेवर व्हेंटिलेटर मिळाला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

हॉस्पिटलचे (इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर) सूर्यभान कुशवाहा यांनी म्हटले की, स्वरूप राणी हॉस्पिटलमध्ये 100 च्या जवळपास व्हेंटिलेटर आहेत जे तिथे दाखल रूग्णांना लावण्यात आले होते आणि जेव्हा डॉक्टर जे. के. मिश्रांना आवश्यकता भासली तेव्हा व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हता. मुख्यमंत्री योगी यांनी वैद्यकीय सेवेच्या टंचाईच्या बातम्या पसरवणार्‍यांची संपत्ती जप्त करण्याचे वक्तव्य केलेले असताना घडलेली ही घटना खुप काही सांगून जाते.