‘या’मुळे शीघ्रपतनाची समस्या ओढवते

वृत्तसंस्था – सेक्स करताना अनेकजण लवकर डिस्चार्ज होतात. म्हणजेच अनेकांना शीघ्रपतन सारख्या समस्येला तोंड द्यावे लागते. इंग्रजीत याला प्रिमॅच्युर इजेकुलेशन (Premature Ejaculation) किंवा अर्ली इजेकुलेशन (Early Ejaculation) असे म्हणतात. तुमचे वीर्य वेळेआधीच लवकर स्खलित होणे म्हणजेच शीघ्रपतन होय.
तुम्ही लवकर गळत असताल तर याचा परिणाम  सेक्स लाईफवर दिसून येतो. याचा परिणाम असा होतो की, तुमचा पार्टनर तुमच्याकडून समाधानी होत नाही. हेच कारण आहे की, व्यक्ती अनैतिक संबंध प्रस्थापित करत असते.  परिणामस्वरूप कुटुंब आणि सारं काही विस्कटतं. यावर उपाय करण्यासाठी लोकं नाना प्रकारचे मार्ग अवलंबतात.
लोकं नीम-हकीम यांच्या जाळ्यात अडकतात. यात आर्थिक व मानसिक शोषण तर होतोच तरी समाधान काही सापडत नाही. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ. महेश नवाल सांगत आहेत या संबंधी काही महत्त्वाची माहिती…
पुढील काही कारणे आहेत जी शीघ्रपतनासाठी कारणीभूत असतात.
1) अती हस्तमैथुन केल्याने शरीराची बायॉलॉजिकल क्लॉक सेट होणे. यामुळे पुरुषांना क्लाइमेक्स पर्यंत पोहचण्याची घाई होते कारण त्यांना लवकरात लवकर आनंदाची अनुभूती हवी असते.
2) सेक्स प्रती अती विचार करणे देखील शीघ्रपतनासाठी जवाबदार आहे. सेक्स फँटेसी किंवा पोर्न सिनेमा बघत राहिल्याने व्यक्ती अती उत्तेजित होतो आणि लवकरच स्खलित देखील.
3) अल्कोहल किंवा डायबिटीजमुळे उत्पन्न न्यूरोपॅथी हे देखील शीघ्रपतन समस्यांचे कारण असू शकतं.
4)सेक्सच्या सुरुवातीच्या काळात या प्रकाराची समस्या उद्भवू शकते.
5)नवीन पार्टनर असला तरी अशा परिस्थितीत लवकर वीर्य स्खलित होऊ शकतं.
6)उत्तेजनासाठी निवडलेल्या पर्यायावर देखील शीघ्र स्खलन अवलंबून असतं.
7)ऑरल सेक्स (मुख मैथुन) मुळे देखील लवकर डिस्चार्ज होऊ शकतं.