निर्भया केस : एकीकडं फाशीची ‘तयारी’, दुसरीकडं दोषींची कुटूंबियांसोबत शेवटची ‘मुलाखत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर निर्भया प्रकरणातील आरोपी आणखी काही दिवसांठी आपल्या क्लुप्त्या लढवत शिक्षेपासून दूर राहिले नाहीत तर गुरुवार त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. जवळपास साडेसात वर्षांनंतर, एका आईला न्याय मिळेल ज्यांची मुलगी या जगात नाही. मुकेशच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.परंतु या चौघांच्या कृत्याने बरीच कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जेव्हा निर्भयाच्या एका अपराधीने असे म्हटले होते की, फाशी दिल्यानंतर या देशात बलात्कार थांबतील तर ते फाशीवर लटकण्यास तयार आहेत. या प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात.

कुटुंबातील व्यक्तींशी शेवटची भेट

निर्भयाच्या तीन दोषींनी अखेर त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली . तिन्ही दोषींची कुटुंबे बंद खोलीत भेटली. अक्षयचे कुटुंबीय अद्याप त्यांना भेटू शकलेले नाहीत, त्यांची पत्नी आणि आई-वडिलांनी यांना भेटायला बोलावले आहे. अक्षयच्या पत्नीनेही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. अक्षयच्या पत्नीचे म्हणणे आहे की तिला विधवा म्हणून जगायचे नाही.

अक्षयचे कुटुंब सापडले भेटले

असे सांगण्यात येत आहे की  पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांच्या कुटुंबियांशी २९ फेब्रुवारी रोजी भेट घडवून आणली. या भेटीच्यावेळी दोघांचेही कुटुंब आणि आरोपी रडत राहिले. त्यानंतर जेलचे काही कर्मचारी त्यांचे सांत्वन करण्यासाठी पुढे आले. २ मार्च ला मुकेश शी त्याचे कुटुंबीय भेटले होते. या भेटीच्या वेळी मुकेश नाराज होता. यावेळी मुकेश ने सांगितले की, अजूनही त्यांच्याकडे काही कायदेशीर पर्याय आहे. निर्भया सामूहिक बलात्काराच्या वेळी मुकेशच दिल्लीत नव्हता ही विनंती दिल्ली हायकोर्टाने बुधवारी फेटाळून लावली.

पुतळ्यांना फासावर लटकवले

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यापूर्वी चार पुतळे एकत्र ठेवले होते. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले गेले जेणेकरून कोणत्याही त्रुटी असतील तर त्या टाळता याव्यात. पुतळ्यांना फाशी देण्यापूर्वी जल्लाद अधिकाकाऱ्यांच्या सूचनेची वाट पाहत होता आणि हावभाव होताच लीव्हर खेचला. लीव्हर खेचताच पट्ट्या उघडल्या आणि पुतळे तळघरात गेले.

चारही पुतळ्यांना जवळपास आर्धा तास लटकलेल्या आवस्थेतच ठेवले होते. तुरुंगातील रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाकाऱ्यांच्या सूचनेनंतर मृतदेह काढण्यात आले. त्यानंतर पोस्टमार्टम चे आदेश देण्यात आले. जेणेकरून हे पक्के माहिती झाले पाहिजे की त्यांच्या अंगात जीव राहिला नाही. कारागृहाच्या अधिकऱ्यांचे म्हणणे आहे की हि एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्याला पूर्ण करणे आवश्यक असते.