President Draupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – President Draupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) आज (मंगळवार) पासून महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) आहेत. राष्ट्रपती मुर्मू या विदर्भातील (Vidarbha) अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांचे आज सायंकाळी 7 वाजता नागपुरात (Nagpur News) आगमन होणार आहे. बुधवारी सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा (Gondwana University) दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू (President Draupadi Murmu) यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा असणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हेही राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान कार्यक्रम –

– राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोली कडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत.
– या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि आरतीमध्ये त्या सहभागी होतील.
– कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.
– राष्ट्रपतींचे मंगळवारी सायंकाळी हैदराबाद येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल.
– मुक्कामानंतर 5 जुलैला सकाळी त्या हेलिकॉप्टरने गडचिरोलीला येतील.
– बुधवारी सकाळी साडेदहाच्या दीक्षान्त समारंभानंतर नागपुरात येतील.
– सायंकाळी कोराडी येथे भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल.

Web Title : President Draupadi Murmu | president draupadi murmu on vidarbha visit today inaugurated the ramayana cultural center in koradi on 5 july

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 4 July Rashifal : वृषभ, कर्क आणि तुळ राशीवाल्यांच्या इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या इतर राशींची स्थिती

Actress Radhika Madan | अभिनेत्री राधिका मदनचे नवे हॉट देसी फोटोशूट; नेटकऱ्यांच्या नजरा फोटोवर खिळल्या.

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Devendra Fadnavis | “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील” – देवेंद्र फडणवीसांची माहिती