Today Horoscope | 4 July Rashifal : वृषभ, कर्क आणि तुळ राशीवाल्यांच्या इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या इतर राशींची स्थिती

नवी दिल्ली : Today Horoscope | ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली आपल्याला सांगते की, या दिवशी ग्रह-तारे अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल (Today Horoscope) किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, ते जाणून घेवूयात (Dainik Rashifal).

मेष (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस चांगल्या संपत्तीचे संकेत देत आहे. नोकरीत कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे ते नाराज राहतील आणि तणावात राहतील. अचानक प्रवासाला जावे लागेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सुरू असलेला परस्पर तणाव आज दूर होईल. विद्याथ्र्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. नवीन गुंतवणूक करण्याची संधी मिळाल्यास त्यामध्ये सावधगिरी बाळगा, अन्यथा पैसे अडकू शकतात.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस प्रभाव आणि वैभव वाढवेल. लक्ष अध्यात्माच्या कार्याकडे जाईल. पूजा आणि भजन कीर्तन इत्यादींमध्ये खूप रस असेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते आज मिळतील. व्यवसायात काही नवीन उपकरणांचा समावेश करावा लागेल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. (Today Horoscope)

 

मिथुन (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस सामान्य आहे. कामात निष्काळजीपणा टाळा. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाची जास्त काळजी घ्याल. जे लव्ह लाईफ जगत आहेत, त्यांना जोडीदाराचे बोलणे समजून घ्यावे लागेल, अन्यथा भांडण होऊ शकते. प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवा, अन्यथा समस्या निर्माण होईल. जोडीदारासोबत काही नियोजन करून संतती भविष्यासाठी योजना बनवू शकता. आज प्रभावशाली लोकांशी भेट होईल.

कर्क (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस फायदेशीर आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. जास्त तळलेले अन्न टाळा. आर्थिक स्थितीबद्दल काळजीत असाल तर आज ती बदलेल. एखाद्याला पैसे दिले असतील तर ते आज परत मिळतील. आळस सोडून कामाकडे वाटचाल करावी लागेल, तरच काम पूर्ण करू शकाल. आईशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. काही नवीन व्यावसायिक योजनांवर पूर्ण लक्ष द्याल. शक्ती योग्य कामात लावा, अन्यथा समस्या येऊ शकते. भविष्यासाठी पैसेही वाचवू शकाल. मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त असेल. वडिलांना आज पैशाशी संबंधित एखादी समस्या असू शकते. कौटुंबिक सदस्यांसह, कुठेतरी सहलीला जाण्याची योजना कराल. व्यवसायात आज मोठा फायदा होऊ शकतो. (Today Horoscope)

कन्या (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. तो तुमच्यावर रागावला असेल तर मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रवासात महत्त्वाची माहिती मिळेल. संततर बाजूने काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. विद्याथ्र्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे.

तूळ (Libra Daily Horoscope)

आजचा दिवस नवीन योजना बनवण्याचा आहे. शक्ती योग्य कामात लावली तर ते चांगले राहील. विरोधक विरोधात सुनियोजित कट रचू शकतात. कर्ज देण्याचे टाळा. तुमच्या बोलण्यातल्या सौम्यतेमुळे आज आदर मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी दिवस थोडा कमजोर आहे. त्यामुळे जास्त पैसे गुंतवू नका, अन्यथा नंतर मोठे नुकसान होऊ शकते.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरीच्या ठिकाणी घाईगडबडीत काम करणे टाळा. वरिष्ठांच्या सल्ल्याने महत्त्वाचा निर्णय घेतल्यास चांगले राहील. संपत्तीशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर त्यात विजय मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवांचा पुरेपूर फायदा घ्याल. माता-पित्यांना धार्मिक सहलीला घेऊन जाऊ शकता. खूप दिवसांनी जुना मित्र भेटेल. (Today Horoscope)

 

धनु (Sagittarius Daily Horoscope)

नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात अचानक लाभ झाल्यामुळे आनंदी असाल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजाराने ग्रासले असल्यास, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. प्रॉपर्टी डीलिंग करणाऱ्या लोकांना मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वाद होऊ शकतो. घरापासून दूर नोकरी करत आहेत, त्यांना कुटुंबातील सदस्यांची आठवण येऊ शकते. व्यवहाराच्या बाबतीत डोळे आणि कान उघडे ठेवा.

मकर (Capricorn Daily Horoscope)

आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी काही कामे पूर्ण न झाल्यामुळे तणावात राहाल.
वाहन चालवताना काळजी घ्या, अपघात होऊ शकतो. दूरच्या नातेवाईकाकडून निराशाजनक माहिती ऐकायला मिळू शकते.
जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्यांमुळे धावपळीत व्यस्त असाल. मनही अस्वस्थ होईल.
मातृपक्षाच्या लोकांकडून आदर मिळेल. विद्याथ्र्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. पौष्टिक आहार घ्या.
बँक, व्यक्ती, संस्था इत्यादींकडून पैसे घेतले असतील तर मोठ्या प्रमाणात परत करू शकाल.
अनावश्यक सल्ला देणे टाळा. नवीन वाहन घेऊ शकता. कुटुंबात आनंद कायम राहील.
माता-पित्याच्या मदतीने संततीसंबंधित समस्या सोडवू शकता.

 

मीन (Pisces Daily Horoscope)

आजचा दिवस आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा आहे. समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ती मोठ्या आजारात बदलू शकते.
नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठाकडून सहजतेने कामे करून घेऊ शकाल. कुटुंबातील मुलांसोबत थोडा वेळ मजेत घालवाल.
घरातील छोट्या-छोट्या गोष्टींची पूर्ण काळजी घ्याल. भावंडांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

 

 

Web Title :  Today Horoscope | Daily Rashi Bhavishya 04 july 2023 know today horoscope
daily horoscope prediction for libra virgo aries in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा