रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला Statue of Unity, PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांनी केवडिया (Gujrat) या ठिकाणी असणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) ला भेट देणं सुलभ व्हावं यासाठी देशातील विविध भागातून केवडियामध्ये आठ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवत रवाना केल्या. या गाड्या केवडियाला वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आमि प्रतापनगरला जोडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) म्हणाले की, देशाच्या आणि रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडत आहे की अशा प्रकारच्या गाड्यांना एकत्र हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काही रेल्वे स्टेशनच्या इमारतींचे देखील उद्घाटन केले.

यावेळी गुजरातमधील रेल्वे संबंधित प्रकल्पांच्या उद्घघाटनादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रेल्वे स्थानकांमध्ये स्थानिक वैशिष्ट्ये आणि आधुनिक प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. केवडिया हे ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र असलेले देशातील पहिले स्टेशन आहे.