India-China Face-Off : ‘ड्रॅगन’ला सूचक इशारा, चीनसोबतच्या तणावादरम्यानच PM मोदी पोहचले लेह सीमेवर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनबरोबर सीमा गतिरोध आणि चिनी सैन्यासह चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी लेह लडाख येथे पोहोचले. पंतप्रधानांनी येथील सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि नीमू पोस्टचीही चौकशी केली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी सैनिकांशी संवाद साधला.

पीएम मोदी यांच्या यात्रेदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे त्यांच्यासोबत होते. या दौर्‍यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पंतप्रधानांसह नाहीत. 15 जून रोजी लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या सदस्यांची ही पहिली भेट आहे. तेथे चिनी सैन्यासह आमने-सामने झालेल्या चकमकीत 20 सैनिक ठार झाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लेहचा दौरा रद्द केल्याच्या काही दिवसानंतर पंतप्रधान लेहच्या दौऱ्यावर गेले. माहितीनुसार, कमांडर स्तरावरील चर्चेच्या तीन फेरीरम्यान चिनी सैन्य आश्वासने पूर्ण करेल की नाही याची सरकार वाट पाहात होती. त्यानंतरच संरक्षणमंत्री भेट देतील.