कोविड-19 वर सूचना आणि अनुभवांबाबत PM मोदींनी केली देशभरातील डॉक्टरांशी चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरातील डॉक्टरांशी कोविड-19 वर त्यांच्या सूचना आणि अनुभवांबाबत जाणून घेतेले. वृत्तसंस्था एएनआयनुसार, पीएम मोदी यांनी कोविड केयरमध्ये काम करत असलेल्या डॉक्टरांच्या गटाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली.

या दरम्यान, जम्मू काश्मीर, नॉर्थ ईस्टसह देशभरातील डॉक्टर उपस्थित होते. डॉक्टरांनी या धोकादायक महामारीला तोंड देण्याच्या दरम्यानचे आपले अनुभव सांगितले आणि आपल्याकडून सूचना दिल्या.

देशाला आता कोरोना प्रकरणांच्या बाबतीत दिलासा मिळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तज्ज्ञांशी सतत्याने चर्चा करत आहेत. अनेक राज्यांनी कडक प्रतिबंध लागू केल्याने सातत्याने नवीन केस कमी होताना दिसत आहेत.

यासोबतच, केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर काम करत आहेत. जेणेकरून या महामारीशी सामना करता येईल. मात्र, व्हॅक्सीनच्या टंचाईने व्हॅक्सीनेशनचा वेग देशात जोर पकडताना दिसत नाही.

देशात सोमवारी मागील 24 तासात कोरोना संसर्गाची 2 लाख 81 हजार 386 नवी प्रकरणे समोर आली आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशात 27 दिवसानंतर 3 लाखांपेक्षा कमी केस आल्या आहेत. मात्र, कोरोनाने मृत्यू होण्याचा आकडा अजूनही चार हजाराच्या वर आहे. यामुळे केंद्र आणि राज्य चिंताग्रस्त आहेत.