“ये भाई लोग जैसा कोई हार्ड नही”

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन – टिम इंडियाचा युवा कसोटीपटू पृथ्वी शॉ नेहमीच आपल्या कर्णधारांचा आदर करत असतो. तसंच तो भारतीय कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे कौतुकही नेहमी करत असतो. पृथ्वीने आता वेगळ्याच पद्धतीनं या दोघांचे कौतुक केले आहे. सध्या गली बॉय या चित्रपटाचा फिव्हर सर्वच तरूणाईवर चढलेला आहे. पृथ्वीने याच चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा वापर करत दोघांचे कौतुक केले आहे.

‘ये भाई लोग जैसा कोई हार्ड नही है’, असं म्हणत पृथ्वीनं आपल्या सिनीअर खेळाडूंना मान दिला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं काल अनावरण झालं. या सोहळ्याला धोनी, कोहली, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ हजर होते. यावेळी पृथ्वीने विराट-धोनी सोबतचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

दरम्यान, पृथ्वी शॉने नुकतच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्यात पृथ्वीला दुखापत झाली होती. आता पृथ्वॉ भारतीय संघात कधी पुनरागमन करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.