अभिनेत्री प्रियंका चोप्रानं केली ‘अल्कोहोलिक’ ब्रॅन्डची जाहिरात, ‘ते’ बोलले – ‘अस्थमा’ ठीक झाला का ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन – अभिनेत्री प्रियांका चोप्राने जेव्हापासून गायक निक जोनससोबत लग्न केले आहे तेव्हा पासून जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे ती सतत लाईम लाईटमध्ये असते. कधी त्यांच्या पार्टी, कधी हॉट फोटोशुटमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती सिगरेट पितानाचा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हा तिच्यावर अनेकांनी टीका केली. त्यानंतर आता पुन्हा प्रियंका ट्रोल होत आहे.

प्रियंकाने नुकतीच एका अल्कोहाेलच्या ब्रँडची जाहिरात केली. हे तिचे फॅशन टूर होते. यात प्रियंका यात आपल्या यशस्वी आयुष्याचे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत आहे. या व्हीडिओमध्ये प्रियंका भलेही या अल्कोहोलचे प्रमोशन करत नसली तरी तीला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे.

या व्हिडिओवरून तिला लोकांनी ट्रोल केले आहेत. अनेकांनी टीका करत ‘अस्थमा ठीक झाला, आता दारू चालत आहे’, अशी टीका केली आहे. तसच एका युजरने यांचे आजार देशाबाहेर गेल्यावर लगेच नीट होतात, असं म्हटलं आहे. तर दीदीला कोणी सिगार आणून द्या, तर एकाने हे लोक पैशांसाठी वीषाचेही प्रमोशन करतील, अशा अनेक टीका केल्या आहेत.

प्रियंकांची टीका करताना अनेकांनी तिचे कौतुकही केले आहे. व्हीडिओमध्ये प्रियंकाने तिच्या यशाविषयी सांगितले असून तिचे यश आणि मिळवलेले यश तिने तिच्या हिमतीवर मिळवले असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. हा व्हीडिओ ब्लॅक आणि व्हाईट मध्ये बनवण्यात आला आहे. तसंच प्रियंका यात तीन वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. सर्व लुकमध्ये प्रियंकाचा बोल्ड अंदाज दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त