Priyanka Chopra | प्रियांका चोप्राला करायचे नव्हते चित्रपटांमध्ये काम; मिस वर्ल्डनंतर होता दुसराच प्लॅन

पोलीसनामा ऑनलाइन – देसी गर्ल (Bollywood Desi girl) म्हणून ओखळली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने बॉलीवुडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. यानंतर तिने आपला मोर्चा हॉलीवुडकडे (Priyanka Chopra In Hollywood) वळवला व तिथेही आता ती दमदार प्रदर्शन करत आहे. अभिनय क्षेत्रात उत्तुंग यश कमावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिला मात्र या क्षेत्रात येण्याची इच्छाच नव्हती असा खुलासा प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी केला आहे. घरांच्या आग्रहामुळे प्रियांकाने पहिला चित्रपट केला अशी माहिती आता समोर येत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही फॅशन व ब्युटी इंडस्ट्रीशी निगडित होती. 2000 साली मिस वर्ल्ड (Miss World 2000) किताब आपल्या नावी केलेल्या प्रियांकाचा करिअर प्लॅन वेगळा होता. चित्रपटांमध्ये काम करायचे असे तिच्या मनी ध्यानी देखील नव्हते. मिस वर्ल्ड झाल्या नंतर तिने एक वर्षाचा ब्रेक घेतला. त्यानंतर प्रियांका पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र त्या दरम्यान तिला बॉलीवुडमधील चित्रपटाची मोठी ऑफऱ आली. (Priyanka Chopra First Movie) तिला काम करायचे नव्हते मात्र फॅमिलीच्या आग्रहामुळे तिने ही ऑफर स्वीकारली.

मधु चोप्रा (Madhu Chopra) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “जेव्हा ती मुंबईमध्ये परतली तेव्हा साहजिकच तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, पण ती पूर्णपणे चित्रपटांच्या विरोधात होती. प्रियांका म्हणत होती की, नाही, मला हे काही करायचे नाही. मला अभ्यास करायचा आहे. मधु चोप्रा पुढे म्हणाल्या की, आम्ही तिला सांगितले की अशा संधी रोज येत नाहीत. तुम्ही आधीच एक वर्षाचा गॅप घेतला आहे, अजून दोन महिने घे. चित्रपट कर. (Priyanka Chopra Movies) जर तुला ते आवडल नाही तर तू परत अभ्यास करू शकते. पण आम्ही तुला चित्रपट कर असं म्हणणार नाही.” यावर प्रियांकाने होकार दिला व पहिला चित्रपट स्वीकारला.

प्रियांकाच्या (Priyanka Chopra) आईने सांगितले की, प्रियांका आलेली पहिलीच ऑफऱ ही खूप चांगली होती व कॉन्ट्रैक्टही मोठा होता. यावर प्रियांका म्हणाली होती की, तुम्ही मला हे करायला सांगत आहात म्हणूनच फक्त मी हे करत आहे. मात्र पुढे प्रियांकाने कॅमेऱ्याचा सामना केला तेव्हा तिला ते काम आवडले आणि तिने तिच्या आवडीनुसार याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला असे मधु चोप्रा यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

Web Title :  Priyanka Chopra | madhu chopra reveals priyanka chopra against after winning the miss world crown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध