‘मिसेस जोनास’ झालेली प्रियांका लग्नानंतर पहिल्यांदाच टॉक शोमध्ये लावणार हजेरी

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लग्नानंतर पहिल्यांदाच इंटरनॅशनल शोमध्ये हजेरी लावणार आहे. ‘द एलन डीजेनेरस’ या अमेरिकेच्या लोकप्रिय टॉक शो मध्ये प्रियांका दिसणार आहे. या शोमध्ये तीआपला तिसऱ्या हॉलिवूड चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे.याआधी प्रियंकाने २०१६ मध्ये या शोमध्ये हजेरी लावली होती.

३० जानेवारीला प्रियांका या शोसाठी शूट करणार आहे.अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका प्रथमच एका इंटरनॅशनल शोमध्ये गेस्ट बनून जाणार असल्याने, हा क्षण तिच्यासाठी खास असणार आहे.

प्रियांकाचा तिसरा हॉलिवूड सिनेमा ‘इज नॉट इट रोमॅन्टिक’ लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटात ती अभिनेता रेबल विल्सन, लियाम हेम्सवर्थ आणि एडम डेविनसोबत दिसेल. या रोमॅन्टिक कॉमेडी हॉलिवूडपटात प्रियांकाने योगा अ‍ॅम्बिसीडर इसाबेलाची भूमिका साकारली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला  हा चित्रपट रिलीज होणार आहे.

गतवर्षी १ डिसेंबरला प्रियांकाने ख्रिश्चन पद्धतीने तर २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न करून निकसोबत लग्नगाठ बांधली होती.प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रियांका सोबत फरहानअख्तर दिसणार आहे.