प्रियांका चोप्राला इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण, सांगितल्या सर्वात आवडत्या 3 भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ते हॉलिवूड स्टारपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Bollywood Actress Priyanka Chopra) हिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये तब्बल 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. तीच्या अऩेक चित्रपटातील भूमिका आठवणीत राहतील अशाच आहेत. अशातच 20 वर्षाच्या कारकिर्दीत तीने साकारलेल्या तिच्या सर्वात जास्त आवडलेल्या भूमिका कोणत्या हे तिने एक व्हिडीओ शेअर करून सांगितले आहे.

याबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून ज्यात तिने ‘बाजीराव मस्तानी’, 7 खून माफ’ आणि ‘बर्फी’ या तीन सिनेमातील भूमिका तिच्या सर्वात आवडत्या भूमिका असल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओसोबत प्रियांकाने पोस्ट लिहले आहे की, मनोरंजन क्षेत्रात माझी 20 वर्षे पूर्ण…मला काही वेगळ्या, यादगार भूमिका साकारण्याचे सौभाग्य मिळाले, या भूमिका एकापेक्षा एक दिग्दर्शकांनी उभारल्या होत्या. आज मी अशा ती अद्भूत भूमिकांबाबत बोलत आहे ज्या मी काळानुसार साकारल्या आहेत. खोली, संघर्ष आणि लवचीकपणा. 3 अद्भूत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

दरम्यान प्रियांका सध्या अमेरिकेत राहत असून वेगवेगळ्या हॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे. अनेक सिनेमांच शूटींग तिने पूर्णही केले आहे. तसेच तिचे पुस्तकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यात तिने तिच्या जीवनातील काही खास पैलू उलगडले आहेत.