प्रियांका-निक चे रिसेप्शन कार्ड झाले व्हायरल 

मुंबई  : वृत्तसंस्था – प्रियांका चोप्रा चे लग्न ठरल्या पासून ते लग्न होई पर्यंत अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले आहे.  १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. लग्नात हत्ती घोड्यांचा वापर केल्यामुळे प्रियांका ट्रॉल ही झाली. त्यानंतर प्रियांकाने दिल्लीत रिसेप्शनदेखील दिले. या रिसेप्शन सोहळ्याला पतंप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सेरमनीमध्ये प्रियांका – निक उपस्थित होते.

आता या नंतर प्रियांकाच्या रिसेप्शनचे वेडिंग कार्ड  इंटरनेट वर व्हायरल झाले आहे  प्रियांका दोनरिसेप्शन देणार असून पहिले १९ डिसेंबरचे रिसेप्शन फॅमिलीसाठी तर २०डिसेंबरला बॉलिवूडसाठी. नुकतेच प्रियांकाचे रिसेप्शन कार्ड इंटरनेटवर व्हायरलझाले असून  यात २० तारखेचा वेन्यू लिहिला आहे.

प्रियांका  लवकरच  ‘द स्काय इज पिंक’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.

प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे  तिच्या चाहत्यांसाठी इंटरेस्टिंग असणार आहे. या  यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.