आता घरबसल्या PAN कार्डचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करा, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या युगात प्रत्येकासाठी कायम खाते क्रमांक म्हणजे पॅनकार्ड असणे खूप महत्वाचे आहे. अशी अनेक कामे आहेत जिथे पॅनकार्ड आवश्यक आणि अनिवार्य आहे. जेव्हा आपण बँक खाते उघडता, कर भरता किंवा अन्य आर्थिक उलाढाली करता तेव्हा आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते. याशिवाय ५०,००० रुपयांपेक्षा अधिक किमतीची वस्तू खरेदी करण्यासाठी पॅनकार्डवरील माहिती आवश्यक आहे.

पॅन कार्ड पडताळणी करणे ही एक आवश्यक आणि सोपी प्रक्रिया आहे, जी ऑनलाइन करता येते. ऑनलाईन पडताळणीच्या सुविधेमुळे पॅनधारक पॅनची पडताळणी स्वतः करू शकतात आणि त्यांना आयकर कार्यालयात जाण्याची देखील गरज नाही. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलींग वेबसाइटवर जाऊन एखादी व्यक्ती तिच्या पॅनची पडताळणी करू शकते.

आपले पॅन कार्ड ऑनलाइन व्हेरिफाय करण्याच्या स्टेप्स :

१. प्रथम प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा आणि तेथे लॉग इन करा.

२. आता ‘My Profile’ पर्यायावर जा. येथे, आपल्याला आपले पूर्ण नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबर यासारखी माहिती भरावी लागेल.

३. आता आपल्याला आपल्या पॅनची स्थिती भरावी लागेल. हे एकल, कंपनी किंवा हिंदू अविभाजित कुटुंब यांमधील एक प्रकारचे असू शकते.

४. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिलेला कॅप्चा कोड भरावा लागेल आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

५. आता आपले पॅन कार्ड सत्यापन स्थितीसह (Verified) दिसून येईल.

पॅन कार्ड पडताळणी या तीन अन्य माध्यमांद्वारे देखील होते:

१. फाइल-आधारित पॅन कार्ड पडताळणी:
या प्रकारची पॅनकार्ड पडताळणी बर्‍याच संस्था व सरकार करतात. ते एकाच वेळी १००० पेक्षा जास्त पॅन कार्ड व्हेरिफाय करू शकतात.

२. स्क्रीन आधारित पॅनकार्ड पडताळणी:
ही सेवा वापरुन ५ पॅनकार्डची एकाच वेळी पडताळणी करता येतील.

३. सॉफ्टवेअर (API) आधारित पॅन कार्ड पडताळणी:
येथे आपण सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून पॅन कार्ड पडताळणी करू शकता.

Visit – policenama.com 

 

You might also like