Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Prostate Cancer | जगभरातील एक चतुर्थांश पुरुष लघवी करण्यासाठी वारंवार उठतात, परंतु त्यांच्यापैकी फक्त पाचव्या व्यक्तीलाच जाणवते की हे प्रोस्टेटच्या समस्येचे लक्षण असू शकते. यापैकी सुमारे २० टक्के पुरुषांना असे वाटते की त्यांच्या झोपेच्या व्यत्ययाचा त्यांच्या प्रोस्टेटशी काही संबंध आहे, परंतु २९ टक्के हे वृद्धत्वापर्यंत मर्यादित करतात. (Prostate Cancer)

ही चिंतेची बाब आहे की ४३ टक्के लोक याबाबत डॉक्टरांना भेटणेही टाळतात. कारण,
रात्री वारंवार लघवी करण्याची गरज हे प्रोस्टेट कॅन्सरच्या स्पष्ट लक्षणांपैकी एक मानले जाते.
कोणत्याही कॅन्सरप्रमाणे, ट्यूमरची वाढ थांबवण्यासाठी प्रोस्टेट कॅन्सरच्या लक्षणांवर त्वरित उपचार केले पाहिजेत.
(Prostate Cancer)

एका रिपोर्टनुसार, २०२० मध्ये प्रोस्टेट कॅन्सरमुळे ३.७५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
म्हणूनच, संशोधक पुरुषांना आवाहन करत आहेत की, प्रोस्टेट समस्या दर्शवणारे काही संकेत
दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?

प्रो. कॅन्सर हा पुरुष प्रोस्टेट ग्रंथीमध्ये विकसित होतो. प्रोस्टेट ग्रंथी पुरुष प्रजनन प्रणालीचा एक भाग आहे.
प्रोस्टेट कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा प्रोस्टेटच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात.

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे

  • वारंवार लघवीला जाण्याची गरज, विशेषता रात्रीच्या वेळी.
  • घाईने शौचाला जाण्याची गरज.
  • लघवी सुरू होण्यास त्रास.
  • लघवी करताना ताण येणे किंवा जास्त वेळ लागणे.
  • कमकुवत फ्लो.
  • लघवी पूर्ण झालेली नाही असे वाटणे.
  • लघवीत रक्त येणे किंवा वीर्यामध्ये रक्त येणे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, ह्यांनी कोव्हीड पण…’ राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित