COVID-19 : भारतात ‘कोरोना’ संक्रमित रूग्णांवर उपचार करण्याच्या पद्धतीत होईल बदल, ‘या’ औषधांच्या परीक्षणानंतर घेण्यात आला निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूच्या प्रकरणांची गती हळूहळू कमी होत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे की सध्या कोविड ट्रीटमेंटच्या प्रोटोकॉलचा आढावा घेतला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका मोठ्या चाचणी निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. डब्ल्यूएचओ (WHO) च्या नेतृत्वाखाली चार औषधांवर ट्रायल केले गेले, जे मृत्यू दर कमी करण्यात अपयशी ठरले. यामध्ये अँटीवायरल औषध रेमडीसीवीर, मलेरिया औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (HCQ), एक अँटी-एचआयव्ही कॉम्बीनेशन लोपीनविर आणि रीटोनविर आणि इम्यूनोमोड्यूलेटर इंटरफेरॉनचा समावेश आहे. प्रथम दोन औषधे अशा कोरोना रूग्णांसाठी आहेत ज्यांना संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुढच्या संयुक्त टास्क फोर्सच्या बैठकीत या प्रोटोकॉलचा आढावा घेतला जाईल, ज्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्हीके पॉल, सदस्य (आरोग्य) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) डॉ. बलराम भार्गव असतील.

‘आम्ही क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलला पुन्हा सुधारित करू’
या अहवालानुसार डॉ. भार्गव म्हणाले, ‘होय, आम्ही नवीन रिझल्ट लक्षात ठेवत क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलला पुन्हा सुधारित करू.’ दरम्यान एचसीक्यू (HCQ) ला भारताच्या कंट्रोलर जनरलद्वारे सौम्य प्रमाणात आजारी असणाऱ्या कोविड -19 रुग्णांच्या वापरासाठी मान्यता दिली गेली आहे. त्याच वेळी रेमडीसीवीरला इमर्जन्सीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

डब्ल्यूएचओच्या सॉलिडॅरिटी ट्रायल म्हणून ओळखल्या जाणार्‍या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की या औषधांच्या परिणामांवर आता 30 देशांतील 405 रुग्णालयांमध्ये संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये कोविड -19 मधील 11,266 वयस्कर संक्रमितांचा समावेश होता. त्यापैकी 2,750 रेमडीसीवीर, 954 एचसीक्यू, 1,411 लोपिनवीर, 651 इंटरफेरॉन प्लस लोपिनवीर, 1,412 इंटरफेरॉन आणि 4,088 लोकांना इतर औषधे दिली गेली ज्यांचावर कोणताही अभ्यास झालेला नव्हता.

हे औषधे काम करतात की नाही !
भारत देखील या चाचण्यांचा भाग होता आणि या चार औषधांची चाचणी घेण्यात आली. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत कोविडच्या 937 रुग्णांवर आणि 26 यादृच्छिक ठिकाणी या औषधांच्या चाचण्या केल्या गेल्या. या चाचण्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. के श्रीनाथ रेड्डी म्हणाले की, ‘या चाचण्यांचा हेतू ही औषधे काम करतात की नाही हे पाहणे होते. आम्हाला असे आढळले आहे की ही औषधे काम करत नाहीत आणि उत्तरे मिळवणे हे आवश्यक होते.’

अभ्यासाचे सह-लेखक रेड्डी म्हणाले की, ‘इंटरफेरॉनसारख्या औषधांच्या चाचणीने असे सिद्ध केले आहे की ते रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना नुकसान पोहोचवण्याच्या मार्गावर आहेत, म्हणूनच ही औषधे सुरू ठेवण्यात काही अर्थ नाही. आता आम्ही इतर उपलब्ध औषधे वापरु शकतो जी स्वस्त देखील असू शकतात.’