EPFO नं पुन्हा दिली PF अकाऊंटमधून पैसे काढण्याची ‘विशेष’ सूट, केवळ 3 दिवसात मिळेल रक्कम; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईपीएफओने EPFO कोरोना काळात आपल्या खातेधारकांना दिलासा देत पीएफ खात्यातून अॅडव्हान्स पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट पाहता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या पाच कोटीपेक्षा जास्त खातेधारकांना दुसर्यांदा दिलासा दिला आहे. मागच्या वर्षीच्या सुरूवातीला ईपीएफओने सदस्यांना महामारीमुळे आकस्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी पैसे काढण्याची परवानगी दिली होती.
‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे
नव्या आदेशानुसार, ईपीएफओ EPFO सदस्यांना तीन महिन्यांची मुळ सॅलरी (बेसिक सॅलरी+महागाई भत्ता म्हणजे डीए) किंवा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा रक्कमेच्या 75 टक्केपर्यंतची रक्कम (ज्या पैकी जे कमी असेल) काढण्याची परवानगी दिली आहे, जी परत करण्याची गरज नाही. तुम्ही कमी रक्कमेसाठी सुद्धा अर्ज करू शकता.
मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही खातेधारक सहजपणे ऑनलाईन अॅडव्हान्स रक्कम काढू शकतात आणि त्यांना हे अॅडव्हान्स परत करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जेवढी रक्कम काढाल, तेवढी रक्कम तुमच्या पीएफ खात्यातून कमी केली जाईल. यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येाजना, 1952 मध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे.
दुसर्यांदा सुद्धा काढू शकता पैसे
कामगार मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले की, कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान आपल्या खातेधारकांना मदत करण्यासाठी ईपीएफओने आपल्या सदस्यांना दुसर्यांदा कोविड अॅडव्हान्स घेण्याची परवानगी दिली आहे, जे परत करण्याची आवश्यकता नाही. ज्या लोकांना मागच्या वर्षी आपल्या पीएफ खात्यातून अगोदर अॅडव्हान्स घेतले होते, ते सुद्धा नवीन ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
अवघ्या 3 दिवसात मिळतील पैसे
नवीन बदलानंतर खातेधारकांना अॅडव्हान्सची ही रक्कम अवघ्या तीन दिवसांच्या आत मिळेल. ईपीएफओच्या ऑनलाइन व्यवस्थेच्या अंतर्गत पैसे काढण्याची प्रक्रिया तीन दिवसात पूर्ण होईल. कोरोना महामारीच्या दरम्यान सदस्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) अंतर्गत विशेष विड्रॉलची तरतूद मार्च 2020 मध्ये केली होती. या संबंधीची एक दुरूस्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, 1952 मध्ये करण्यात आली होती.