PSI Rajendra Bagul | पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बागुल यांना शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्य मेडल

पोलीसनामा ऑनलाइन – PSI Rajendra Bagul | बाकू, अझरबैजान येथे सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये (World Championship Of Shooting) मीरा-भाईंदर आयुक्तालयातील भाईंदर पोलीस ठाण्यास (Bhayandar Police Station) नेमणुकीस असलेले नेमबाज पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र रवींद्र बागुल यांनी 25 मीटर सेंटर फायर पिस्टल या प्रकारामध्ये सांघिक कांस्य पदक प्राप्त केले, सदर स्पर्धेमध्ये 1743 गुण मिळवून जर्मनी देशाचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला तर 1731 गुण वरती कोरिया देश रौप्य पदक प्राप्त करू शकला. भारताच्या संघाने 1718 गुण मिळवून कांस्यपदक प्राप्त केले. 14 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये जगभरातून 101 देशांचे 1249 नेमबाज खेळाडू सहभागी झाले आहेत. (PSI Rajendra Bagul)

राजेंद्र बागुल यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर 25 मीटर 50 मीटर व दहा मीटर पिस्टल प्रकारांमध्ये
अनेक पदके मिळवली आहेत. सातत्यपूर्ण सराव आणि वरिष्ठांच्या प्रोत्साहनामुळे राजेंद्र बागुल यांनी
भारतीय संघात स्थान मिळवले होते आणि त्यांनी पदार्पणातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक प्राप्त कामगिरी करून भारतासाठी पदक मिळवून दिले. 2020 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले राजेंद्र बागुल हे महाराष्ट्र पोलीस दलातील आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होणारे व पदक प्राप्त करणारे पहिलेच नेमबाज खेळाडू आहेत. (PSI Rajendra Bagul)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | ‘वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा निर्णय, पक्षात फूट पडलेली नाही’, शरद पवारांच्या नव्या गुगलीने राजकीय चर्चांना उधाण (व्हिडीओ)

Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे आता नवीन नियम, काय-काय बदलले, जाणून घ्या

25 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या तीन राशीवाल्यांसाठी दिवस आहे खास, वाचा दैनिक भविष्य

Pune Crime News | पार्किंगमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग, चार जणांवर FIR; कोंढवा परिसरातील घटना