‘भाजपचं वागणं ‘करोना’ व्हायरसपेक्षाही डेंजर’, अशोक चव्हाणांचा भाजपवर ‘हल्लाबोल’ (व्हिडीओ)

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यप्रदेशात भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ सुरु केले आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आठ आमदार दिल्लीत पोहोचल्याने कमलनाथ सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली आहे.

ते म्हणाले, सत्तेसाठी भाजपने सुरू केलेल्या या प्रकाराला ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे तर कोरोना व्हायरसच म्हटलं पाहिजे. भाजपचं वर्तन हे कोरोना व्हायरसपेक्षाही डेंजर असून त्याची दक्षता घेतलीच पाहिजे असे ते म्हणाले.

ADV

लोकशाहीला मानणारे ऑपरेशन लोट्सला भीक घालणार नाहीत –
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, भाजपचं ऑपरेशन लोटस हा नित्याचाच भाग आहे. त्याची आम्हाला सवय झाली असून लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष ऑपरेशन लोटसला कधीही भीक घालणार नाही. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गानेच सरकारे चालली पाहिजेत. मग कोणतीही सरकारे असोत. ज्या राज्यात त्यांचं सरकार नाही. तिथले आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. भापजपंच हे वर्तन करोना व्हायरसपेक्षाही कठीण आहे. त्याची दक्षता घेतलीच पाहिजे, असं सांगतानाच त्यावर अँटिबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

मध्यप्रदेश सरकार विषयीची बोलताना चव्हाण म्हणले, कमलनाथ हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारला कोणताही धोका नाही, असंही त्यांनी सांगितलं.