‘5 कोटी द्या, पंतप्रधानांची हत्या करतो’ असं Facebook वर लिहीणारा अटकेत, जाणून घ्या प्रकरण

पुदुचेरी : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुदुचेरीमध्ये पोलिसांनी 43 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याने लिहिले होते की, जर कुणी त्याला पाच कोटी रुपये दिले तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करेल. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

असे आहे पूर्ण प्रकरण

माहितीनुसार, आर्यनकुप्पम गावातील या रहिवाशाला गुरुवारी (4 फेब्रुवारी) अटक करण्यात आली. यानंतर स्थानिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आले, जिथे आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

कोण आहे पोस्ट करणारा आरोपी?

पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, आरोपीचे नाव सत्यानंदम असून तो रियल इस्टेट व्यवसायिक आहे. त्याच्यावर कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की…

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकवर एक संदेश लिहिला होता. यामध्ये म्हटले होते की, जर कुणी त्यास पाच कोटी रूपये दिले तर तो पंतप्रधानांची हत्या करण्यास तयार आहे. गुरुवारी एका कार चालकाने हा संदेश पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.