पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा पुण्यातही निषेध

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुण्यातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र निषेध केला आहे आणि शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

खासदार अनिल शिरोळे, खासदार वंदना चव्हाण यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना केली आहे.

अमानुष आणि भ्याड हल्ल्यामुळे भारतीय सेना आणि भारतीय जनतेचे मनोधैर्य कदापि खचणार नाही आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचा भारतीयांचा निर्धारही कमी होणार नाही असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे. तसेच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, हमारी अपनी पार्टीनेही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.