Pune Crime News : प्रियकराने लग्न करण्यास केली टाळाटाळ; नैराश्यातून 23 वर्षीय पूर्णा चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्र आणि कुटुंबाच्या सांगण्यावरून प्रियकराने लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या नैराश्यातून 23 वर्षीय तरुणीने ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

पूर्णा बशपंती चौधरी (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर कपिल मदन गोरे याच्यासह कुटुंबीय आणि दोन मित्रांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा हिच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.

Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

मोदी सरकारची मोठी घोषणा ! 12 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात ‘ट्रान्सफर’ होणार पैसे, जाणून घ्या कुणाला मिळणार ‘लाभ’

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंब मूळचे मध्यप्रदेश येथील आहे. पूर्णा ही एका ठिकाणी जॉब करत होती. ती उच्च शिक्षित होती. दरम्यान कपिल व ते एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या 5 वर्षांपासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. यानंतर त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा साखरपुडा देखील झाला. मात्र यानंतर कपिल हा मित्र व कुटुंबीय यांच्या सांगण्यावरून लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला.

Pune : धक्कादायक ! विवाहित प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबध ठेवण्यास टाकला दबाव, तिनं नकार देताच पठ्ठयानं उचललं ‘हे’ पाऊल

तर तिच्याशी फोनवर बोलण्यास देखील टाळाटाळ करत असे. यामुळे ती नैराश्यात होती. या नैराध्यातूनच पूर्णा हिने राहत्या घरी ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने तो इतरांच्या सागण्यावरून लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे या करत आहेत.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी