Pune : 27 वर्षीय डॉक्टर तरूणीच्या नावानं Instagram वर बनवलं Fake अकाऊंट, मोबाइलवर अश्लील मेसेजचा ‘पाऊस’ तर संभाषणाचा ‘भडीमार’
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डॉक्टर तरुणीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करू त्यावर त्यांचा मोबाईल क्रमांक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक दिल्याने अनेकांनी त्यांना अश्लील मेसेज केले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 3 अज्ञात मोबाईलधारक व्यक्तींवर विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या डॉक्टर आहेत. दरम्यान, त्यांच्या नावाने इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करण्यात आले होते. त्यावर फिर्यादी यांचा मोबाईल नंबर देखील टाकण्यात आला होता. त्यामुळे काही दिवसांनी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी लोकांकडून वारंवार फोन येण्यास सुरुवात झाली. तर अश्लिल संभाषण व मॅसेज येऊ लागले. त्यांनी या प्रकाराची माहिती घेतली असता त्यांना बनावट खाते तयार करण्यात आल्याचे लक्षात आले. मग त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सांगिता पाटील या करत आहेत.