Pune : 32 वर्षीय महिलेच्या शरीरसंबंधाचे फोटो काढून ‘ब्लॅकमेलिंग’, पती व सासर्‍यांना Photos दाखवण्याची धमकी देत दाम्पत्यानं लाखोंना लुबाडलं; पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे : ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेचे शरीरसंबंधाचे फोटो काढून ते पती व सासरी दाखविण्यासाठी धमकी देऊन एका दाम्पत्याने महिलेला लाखो रुपयांना लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी दाम्पत्यापैकी पतीला अटक केली आहे़ गणेश जगन्नाथ सोनावणे (रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी वारजे येथे राहणार्‍या एका ३२ वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१२ ते २०१९ पर्यंत सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा गैरफायदा घेऊन गणेश सोनावणे याने पीएमसी कॉलनीतील घरी फिर्यादीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्या शरीरसंबंधाचे फोटो काढले. हे फोटो तिच्या पती व सासरी दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तिच्याकडून ६ तोळ्याचे दागिने तसेच ५ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढून ती रक्कम स्वत: घेतली. त्याच्या पत्नीने साडेतीन तोळ्याचा सोन्याचा हार घेऊन त्याचा अपहार केला. हे दागिने परत देण्याची मागणी केल्यावर त्यांनी शिवीगाळ केली़ या त्रासाला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. खडक पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.