Pune ACB Trap News | लाच स्वीकारताना ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap News | वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच (Accepting Bribe) घेताना ससून रुग्णालयामधील (Sassoon Hospital) एका कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीने (Pune ACB Trap News) ही कारावाई बुधवारी (दि.27) ससून हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केली.

जालिंदर चंद्रकांत कुंभार Jalandar Chandrakant Kumbhar (वय 55, पद -उदवाहक, उपअधीक्षक कार्यालय,
ससून हॉस्पिटल, पुणे) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत 57 वर्षीय व्यक्तीने
पुणे एसीबी (Pune ACB Trap News) कार्यालयात तक्रार केली आहे.
कुंभार हा ससून रुग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहे.

तक्रारदाराने ससून रुग्णालयात एक लाख 43 हजार रुपयांचे वैद्यकीय बिल (Medical Bill) मंजूर करण्यासाठी 1 जून 2023
रोजी अर्ज दिला होता. या बिलाच्या मंजुरीसाठी उपअधीक्षक कार्यालयात काम करणारे जालिंदर कुंभार यांनी वैद्यकीय
बिलाचे दोन टक्के रक्कम प्रमाणे तीन हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी 29 नोव्हेंबर रोजी पुणे एसीबी कार्यालयात येऊन तक्रार दिली होती.

एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणी दरम्यान वैद्यकीय बिल मंजूर कारणासाठी जालिंदर कुंभार यांनी पंचांसमक्ष
तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने बुधवारी ससून हॉस्पिटलच्या मुख्य
प्रवेशद्वाराजवळ सापळा रचला. तक्रारदार ह्यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
कुंभार यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन (Bundagarden Police Station) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
(Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale),
पोलीस हवालदार नवनाथ वाळके, सरिता वेताळ, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SWaCH – Pune Municipal Corporation (PMC) | कचरा गोळा करणार्‍या ‘स्वच्छ’ संस्थेच्या लढ्याला यश; पुणे महापालिका प्रशासनाची पाच वर्षांच्या कराराला मान्यता

Pune Pimpri Chinchwad Crime News | हिंजवडीतील अ‍ॅकॉर्ड अ‍ॅटॉकॅम्प कंपनीत गॅस भट्टीचा स्फोट, 20 कामगार गंभीर जखमी; मालक, प्रशासन यांच्यावर FIR

Jitendra Awhad On Ajit Pawar | ”शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर”, आव्हाडांनी दादांना सुनावले